NashikDiary.com

निमगाव दावडी खंडोबा

Nimgaon Dawdi Khandoba

  • Temple of Nimgaon Dawadi Khandoba
  • Khandoba Nimgaon Dawdi
  • Maharashtra Traditional God, Taak at Khandoba of Nimgaon Dawdi
निमगाव दावडी खंडोबा

सदरचे देवस्थानाचे बांधकाम हेमाडपंथी असून सदरच्या परिसरात २५ दगडी कमानी आहेत. सदर ठिकाणी मार्गशीर्ष शु. प्रतिप्रदा ते चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र उत्सव असतो व फार मोठी यात्रा भरते. सदर मंदिरामध्ये देवास पाणी घालण्यासाठी जवळच असणाऱ्या भीमा नदीचे पाणी आणले जाते. दही-भाताची पूजा बांधली जाते व तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात. यात्रेमध्ये कुस्त्या, बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये करतात.

मार्ग - पुणे जिल्ह्यातील तालुका खेड मधील राजगुरुनगरपासून १० किलोमीटरवर आहे.