Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

आजकालचे वाङ्‍मय - मं. वि. राजाध्यक्ष

Marathi Sahitya

स्वातंत्र्यत्तर काळातील परिवर्तन

१९४०-४५ पर्यंत अशी स्थिती राहिली. १९४७ हे वर्ष मात्र वेगळे मानले पाहिजे. या साली प्रसिध्द झालेल्या बा. सी. मर्ढेकर यांच्या काही कविता या छोट्याशा कवितासंग्रहाने मराठी वाङ्‍मयात क्रांती केली. प्रस्थापित निर्जीव काव्यसंकेतांना झुगारून या कवितांनी, आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत, नवा मार्ग शोधला. गंगाधर गाडगीळ, पु.भा. भावे, अरंविद गोखले, व्यंकटेश माडगूळकर यांच्या शोधक प्रयत्नांमुळे कथेच्या क्षेत्रात कवितेला पूरक चलनवलन चालू झाले. या परिवर्तनामुळे स्वातंत्र्याच्या आणखी शक्यता खुल्या झाल्या. नवतेला सुरुवातीला झालेला विरोध हळुहळू क्षीण झाला,आणि अल्पावधितच, अधीचा वाचक पिढ्यांना रिझवणाऱ्या कितीतरी गोष्टी शिळ्या होऊन गेल्या. मात्र नवसाहित्याची चळवळ आणि राजकीय स्वातंत्र्य यांचा काळ एकच असावा, हा निव्वळ योगायोग होता. प्रस्थापित साहित्यिक विधिनिषेधांबद्दलचे असमाधान काही वर्षांपासून आतल्या आत खद्खद्त होत. त्यातूनच बंडखोर लेखन उसळले. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामांमुळे या लेखानाची जणू निकड उत्पन्न झाली होती. जुन्या ठाम समजुती ढासळल्या; इतकेच नव्हे तर काही नव्या तोडग्यांचासुद्धा भरवसा वाटेना. केवळ तंत्राच्याच बाबतीत नव्हे तरे स्वभाव , दृष्टिकोन आणि हेतू यांच्या बाबतीतसुद्धा या नव्या लेखकात मोठी विविधता होती. तरीसुद्धा या सगळ्यांनी नव्या, न मळलेल्या वाटांचा शोध घेतला आणि निकोप आणि संपन्न जाणिवेची जोपासना केली.
उदाहरणार्थ, मर्ढेकरांची कविता भोवतालच्या जगाबद्दलच्या प्रतिक्रियांतून उद्‍भवली होती, तर पु. शि. रेग्यांची कविता स्वतःच्या वैयक्तिक संवेदनाविश्वातच गढून गेली होती. वैचारिकता हा मर्ढेकरांच्या कवितेतील महत्त्वाचा घटक. रेग्यांची कविता त्याला आपला मानत नाही, या दोघांनी कमी अधिक प्रमाणात, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, व सदानंद रेगे या कवींना प्रभावित आणि प्रेरित केले, आणि बा. भ. बोरकर , इंदिरा संत यांच्यासारख्या जुन्या कवींना नवचेतना दिली.
ही विविधता कथेतही आढळते. नवकथेच्या प्रवर्तकांनी, दि, बा. मोकाशी, के. ज. पुरोहित (शांताराम), वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या कितीतरी लेखकांचे सुप्त सामर्थ्य जागे केले. या बदलत्या साहित्यिक वातावरणाला, इतर वाङ्‍मयप्रकारांकडून प्रतिसाद मिळायला काही काळ जावा लागला. हळूहळू प्रगल्भ होत गेलेले कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी मानवी नातेसंबंधांतील वास्तव्याचा `नव्या' जाणीवेने शोध घेतला. गो. नी. दांडेकरसुद्धा एरवी तसे जुन्या वळणाचे; पण त्यांनी सुद्धा, अधूनमधून जीवनदर्शनाची जाण प्रगट केली. दैवयोगाने एका प्रवासात जवळ आलेली जर्मन-ज्यू तरुणी आणि भारतीय तरुण यांच्या संबंधांची कथा बेडेकरांनी १९३९ साली प्रसिद्ध झालेल्या रणागंणमध्ये सांगितली होती. त्यातील त्या अपवादात्मक आणि चमत्कारीक आधुनिकतेकडे १९५० पर्यंत, कसे कुणास ठाऊक, दुर्लक्षच झाले होते.
नव्या जाणीवेची पहिली चाहूल नाट्याच्या क्षेत्रात, १९५० ते१९६० या दशकाच्या मध्यास, विजय तेंडुलकरांच्या आरंभीच्या लेखनातून, नाना जोगांच्या एकदोननाटकांतून, पु. ल. देशपांड्यांच्या तुझे आहे तुजपाशी या चमकदार उपहासप्रधान नाटकातून लागली. विजय तेंडुलकरांना पुढे नाटककार म्हणून कोठी मान्यता मिळाली. अकाली मृत्यूमुळे नाना जोग त्यांच्याविषयीच्या अपेक्षा पुऱ्या करू शकले नाहीत. नट, नाटककार, दिग्दर्शक म्हणून पु. ल. देशपांड्यांनी पुढे महत्त्वाची कामगिरी केली. या मंडळीच्या प्रयत्नामुळे निःसत्व झालेल्या मराठी रंगभूमीला नवे अवसान आले, आणि ती नवे नवे प्रयोग करायला उद्युक्त झाली.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer