Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

आजकालचे वाङ्‍मय - मं. वि. राजाध्यक्ष

Marathi Sahitya

आणखी काही खास परिसर

प्रतिष्ठित, शहरी, मध्यम वर्गीय जीवनापासून सुटका शोधू पाहणाऱ्या, कंटाळलेल्या वाचकाला काही वर्षापूर्वी `सुंदर गाव' ती संधी देत असे आज या दोन्हीपासून त्याला ही सुटका `असुंदर' झोपडपट्टी देऊ शकते. आज कित्येक वर्षे झोपडापट्टी हा मुंबई शहराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. परंतु १९६२ साली जयवंत दळवींच्या चक्र या कांदबरीतून जेव्हा ती प्रथम मराठी साहित्यात अवतरली तेव्हा सोवळ्या मंडळीला मोठाच धक्का बसला. मुंबई बंदर भागातील एका रहदारीच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टीत चक्रचे कथानक घडते. गलिच्छपणा, बेकायदा दारू गाळण्यासारखी आणि इतरही गुन्हेगारी, स्त्री-पुरुष संबंध आणि हिंसाचार यांच्याबद्दलचा रोखठोकपणा, आणि या सगळ्याखाली लपलेली माणुसकीची ऊब- हे नेहमीचे घटक त्या कादंबरीत होते. याच सुमारास आलेल्या, प्रसंगमालिकेच्या धर्तीच्या, भाऊ पाद्ये यांच्या वासूकाका या कादंबरीने अधिकच खळबळ उडवून दिली. वासूनाका हे तसे झोपडपट्टीचे ठिकाण नव्हे. मुंबईतील बकाल मध्यम वर्गीय वस्तीतील हे ठिकाण. या कांदबरीत जे घडते त्याहीपेक्षा टीकाकारांच्या मते आक्षेपार्ह होती ती त्यातील भडक, अनिर्बंध, शिव्याळ, अश्लील भाषा, सर्वसामान्य लोकांनी आणि नंतरच्या साहित्याने ती भाषा किती प्रमाणात आपलीशी केली, याचे संशोधन करण्यासारखे आहे. यानंतर काही वर्षांनी आलेली माहिमची खाडी ही कादंबरी मुंबईच्या एका अस्सल झोपडपट्टीबद्दल आहे. तडीपार गुंड, नाडलेले लोक, मवाली, समाजकंटक ही त्या कादंबरीतील पात्रे. आणि जोडीला थोडी लैंगिकता आणि हिंसाचार. यापैकी कोणताही कादंबरीकार या जीवनासंबंधीचा नैतिक निवाडा उद्‍घोषित करत नाही. ते जीवन समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; त्याचा गैरफायदा घेण्याचा नव्हे. त्या जीवनाचा निषेध करण्याचाही सूर त्यांच्या लेखनात नाही; किंवा सामाजिक-आर्थिक अथवा राजकीय भूमिका मांडण्यासाठी आधार म्हणून त्या जीवनाचा हे कादंबरीकार वापर करत नाहीत.
एखाद्याच भौगोलिक किंवा आशयवर्ती परिघात रमलेल्या कथालेखाकाच्या बाबतीत, व्यापक जीवनाच्या संदर्भाला तो पारखा होण्याचा धोका संभवतो. उत्तर कोकणाचा परिसर आपल्याला जखडून ठेवणार नाही याचे दक्षता श्री. ना. पेंडशांनी घेतली. तो परिसर सोडून ते मुंबईकडे वळले; आणि हा परिसरसुद्धा त्यांनी सहज आपलासा केला. बहुतेक समीक्षकांच्या मते जी.ए. कुळकर्णी हे मराठीतील आजचे सर्वोत्कृष्ट कथालेखक आहेत. उत्तर कर्नाटक आणि विशेषतः बेळगाव या परिसरात त्यांच्या कथा घडतात. सूक्ष्म तपशीलांनी हा परिसर ते जिवंत करतात; आणि समर्पक प्रतिमांनी त्याला अर्थवत्ता देतात. त्यांच्या कथांतील स्त्रीपुरुष गोंधळलेले आणि निराधार; आपल्या विटक्या परिस्थितीशी जखडलेले; आणि तरीही तिच्यापासून तुटलेले; त्यांचा अटळ शोकात्म, हाच जी. ए. कुळकर्णी यांच्या आशय : सार्वत्रिक आणि सर्वकालिक.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer