Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

आजकालचे वाङ्‍मय - मं. वि. राजाध्यक्ष

Marathi Sahitya

आधुनिकतेला पुनर्जीवन आणि सद्यःकालीन मराठी साहित्य

काव्य

आधुनिकतेच्या चळवळीला नवी प्रेरणा आणि नवी चेतना १९६० च्या सुमारास लाभली हा एक भाग्ययोग मानला पाहिजे; कारण याच साली मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना झाली. याच साली प्रसिद्ध झालेल्या कविता या दिलिप पुरुर्षोत्तम चित्रे यांच्या पहिल्याच कवितासंग्रहात हे नवे वळण दिसते. या वळणावर, त्या आधीच्या काळापेक्षा अधिक वाङ्‍मयप्रकारांतून परिवर्तनाच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या. या नव्या उन्मेषांत अधिक धिटाई होती, अधिक विविधता होती.
या आधीपासून कविता लिहिणाऱ्या पु. शि. रेग्यांच्या कवितेने आपली वैयक्तिकता जपण्याचा स्वभाव सोडला नाही. या कवितेत काळ जणू ठप्प झालेला भासतो. मात्र, बदलत्या वातारणाला चपळ प्रतिसाद देणाऱ्या विदा करंदीकारांच्या कवितेने, गझलसारख्या तरल किंवा विरूपिकेसारखा कणखर रुपबंध नव्याने समर्थपणे आविष्कृत केला. परंपरेने सुंदर आणि शिव मानलेल्या गोष्टींतील भेसूरपण औपहासिकपणे दाखविणाऱ्या करंदीकरांच्या विरूपिकांनी हळव्या वाचकांना चांगलेच अस्वस्थ केले. या काळात मंगेश पाडगावकरांनी उपहासाचा नवा सूर आपल्या कवितेवर चढवला. मग ती कविता, सामजिक आणि राजकीय भ्रष्टाचारावर उघड आणि भेदक टीका करू लागली. नारायण सुर्व्यांच्या उपहासप्रधान कवितांना डाव्या विचारसरणीची गडद डूब आहे. परंतु तिच्या लोकप्रियतेशी राजकीय रंगाचा काही संबंध नाही. नारायण कुळकर्णी, कवठेकरांसारख्या काही तरूण कवींनीसुद्धा या काळात उपहासप्रधान कविता लिहिली. उपहास सहसा उघड असतो. उपरोध हा आधुनिकतेचा एक प्राणविशेष मानला जातो. मर्ढेकर आणि गंगाधर गाडगीळ यांच्या लेखनात तो दिसतो. परंतु त्यांचा पिढीतील पुष्कळ लेखकांच्या साहित्यात लक्षणीय स्वरूपात तो आढळत नाही. साठनंतरच्या काळात मात्र. कधी अस्पष्टपणे कधी स्पष्टपणे , उपरोधाचा अवलंब सातत्याने केलेला आढळतो. दिखाऊपणाबद्दल अधिक संशय बाळगाणाऱ्या, भोळ्या स्वप्नरंजनाला पार विटलेल्या आणि भाषणबाजीने बिथरलेल्या, अशा कालस्वभावाचाच तो उपरोध द्योतक आहे असे वाटते.
आधीच्या पिढीतील (१९४७ ते १९६५ आसपासच्या) बा. भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत यांच्या कवितेवर कालगतीने बदललेल्या भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव पडला नाही. मात्र, त्यांची भावविभोर कविता नव्या काळात अधिक गहिरी जरूर झाली. आत्मनिष्ठा आणि तत्वनिष्ठा यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कवितेबद्दल हे खरे आहे. कवी वसंत बापटांबद्दल मात्र असे म्हणता येत नाही. त्यांची कविता अधून मधून भावकवितेची वाटा सोडून औपरोधिक टीकेकडे किंवा वेगळ्या विषयांकडे वळते. सदानंद रेग्यांच्या कवितेला नवा युगधर्म आधीच दिसला होता. विक्षिप्त कल्पनांचा आधार घेणारी आणि शाब्दिक आणि भावनिक प्रसाधन झुगारून कमालीचा साधेपणा अंगिकारणारी सदानंद रेग्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म तरल आणि अननुकरणीय होत गेली, कविता आणि कथा या दोन वाङ्‍मयप्रकारात रेग्यांनी खास ठसा उमटवला.
दिलिप चित्रे नेहमीच बंडखोर राहिले. त्यांची सर्वाधिक बांधिलकी स्वतःशी होती. त्यांची कविता सरळथेट टीकेच्या अवलंब करत नाही. पण तिच्यातील बौद्धिक-वैचारिक आशयातून भोवतालच्या जगाबद्दलच्या कवीच्या जहाल प्रतिक्रिया समजून येतात. उपरोध आणि अंतर्विरोध यांचे फार चांगले भान चित्र्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेला वेगळे वजन येते. त्यांच्या कथांमध्येही हे वैशिष्ट्य आढळते.
प्रतिभेचा दिव्य स्पर्श लाभलेल्या आणखी एकलेखक म्हणजे चि. त्र्यं. खानोलकर. परंतु त्यांच्या प्रतिभेत लहरीपणाचा दोष होताच. बेभान कल्पना आणि अत्युक्तट भावना म्हणजे खानोलकर. या गोष्टींचा, सुनियंत्रित म्हणून सुंदरही, आविष्कार त्यांच्या भावकवितांत आढळतो. (खानोलकरांनी कविता `आरती प्रभू' या टोपणनावाने लिहिल्या.) नियंत्रण सुटले म्हणजे या गोष्टी निरर्थ व्हायच्या. त्यांच्यामुळे काही नाटके आणि कांदबऱ्या यांचा पोत बिघडून जायचा. मात्र लेखक त्यांच्यावर स्वार झालेला असला म्हणजे कोंडुरा सारखी देखणी कादंबरी किंवा कालाय तस्मै नमः सारखे नाटक सिद्ध व्हायचे. खानोलकरांची आरंभीची काही वर्षे दक्षिण कोकणात गेली. आणि ते जेव्हा मुंबईला आले तेव्हा त्यांनी कोकणचा एक तुकडा आपल्या हृदयात जपून आणला होता. त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यातून मोहक प्रतिमांची निपज व्हायची; आणि तेथील आख्यायिका-दंतकथांतून तर्कशून्यतेची लहर आणि नियतीची जाणीव, यांचे पोषण व्हायचे. तर्कशून्यतेच्या लहरीमुळेच खानोलकरांना विलक्षण व्यक्तिमत्वांचा हव्यास होता असे वाटते. मात्र या व्यक्तिमत्वांना असलेले स्थानिकपन मर्यादितच होते. दक्षिण कोकणचे खानोलकरांनी एका अद्‍भुतरम्य प्रदेशात रूपांतर केले.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer