Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

आजकालचे वाङ्‍मय - मं. वि. राजाध्यक्ष

Marathi Sahitya

तुटलेपण आणि विचकट

तुटलेपणाचा सर्वात प्रभावी चित्रणकर्ता म्हणजे भालचंद्र नेमाडे. कोसला ही त्यांची पहिली, आणि बहुधा सर्वोत्कृष्ट कादंबरी, या कादंबरीचा नायक एक तरूण मुलगा आहे. एक सामाजिक परिपाठ म्हणून महाविद्यालयीन शिक्षण आणि घरची उलढाल या चाकोरीतील गोष्टी त्याला कराव्या लागतात. मात्र त्यांच्याशी त्याचे काहीच नाते जुळू शकत नाही. त्यामुळे त्याची जी फरफट होते तिची हकीकत त्याने कमालीच्या सरल प्रामाणिकपणाने सांगितली आहे. तो वाहवत जातो. आपण वाहवतो आहोत हे त्याला समजत असते. पण तो काहीच करू शकत नाही. हे कळणे हा सुद्धा शापच. भूतकाळ म्हणजे शून्यच; तो बाहेर फेकला जातो; 'outside' होतो. व्यर्थपण आणि वांझोटपन यांचे अत्यंत प्रभावी चित्रण नेमाड्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्थापित प्रतिष्ठित भाषिक साचे आणि वाक्प्रयोग वाकवले, त्यांची मोडतोड केली; त्यांचे विडंबन केले. भाऊ पाध्ये, किरण नगरकर आणि इतर अनेक लेखकांनी भाषेची अशी नवी जडणघडण केला आहे. (भाषेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही खरोखर मोठी उपकारक गोष्ट होय. कारण अनेक साकळलेल्या, सुजलेल्या, झिजलेल्या साच्यांमुळे तिची दुर्दशा झालेली असते.) आपल्या सात सक्कं त्रेचाळीस या कादंबरीत किरण नगरकर निव्वळ भाषिक प्रयोगशीलतेच्या खूप पलीकडे गेले आहेत. मराठीतील ही पहिली `ऍब्सर्ड'- विचकट कादंबरी, नगरकरांची ही पहिलीच आणि एकुलती एक कादंबरे. ही कादंबरी भावनिक आणि बौद्धिक ठामपणाची खिल्ली उडवते. विलास सारंग आणि श्याम मनोहर यांनासुद्धा हे जग विस्कटल्यासारखे वाटते. प्रस्थापित निबर भाषा हे सांगायला समर्थ नाही, असे या लेखकांना वाटते; आणि म्हणून ते तिची नवी मांडणी करू पाहतात.
कादंबरीपेक्षा नाटकातून विचकटाना व्यापक वेधक अविष्कार झालेला आढळतो. कदाचित दृश्यात्मकतेमुळे त्याला एक जादा परिणाम लाभत असेल. परंतु हे विचकट, नाटक सर्वसाधपण प्रेक्षकसाठी नाही त्यामुळे ते बहुशः प्रायोगिक रंगभूमीपूरतेच मर्यादित राहिले. चि.ं त्र्य. खानोलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर हे विचकट लिहिणारे ठळक नाटककार होत. विचकटाच्या अनेक छटा विजय तेंडुलकरांच्या नाटकांतूनही आढळतात. विविध प्रकृतीचे इतके प्रभावी, प्रतिभावंत नाटककार या प्रकाराकडे आकृष्ट झालेले दिसतात की त्यावरून आजच्या सर्जनशील लेखकाच्या भावावस्थेशी त्यांची काही विशेष जवळीक असावी असे वाटते. व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा आगळ्या वेगळ्या, विलक्षण, विक्षिप्त, शोक-हास्यात्मक पात्रांत आणि घटनांना आता वाव मिळू लागला आहे हे जयवंत दळवी आणि विजय तेंडुलकारांच्या नाटकांवरून लक्षात येते. ही चांगली गोष्ट आहे. जीवनाबद्दलच्या ढोबळ आणि गुळगुळीत समजुतींवर दीर्घ काळ पोसल्या गेलेल्या आपल्या जाणीवा आता प्रगल्भ होत आहेत, याची ते आशादायक चिन्ह आहे. चाळीस वर्षांपूर्वी या प्रकारची नाटके हास्यास्पद ठरली असती. त्यांना कदाचित उधळून लावण्यात आले असते. `सर्वसाधारण' म्हणजे काय याबद्दलच्या अधिकाधिक लोकांच्या मनांतील सांकतिक समजुती दूर करून, त्यांची दृष्टी फाकवण्याचे पुष्कळ श्रेय गंगाधर गाडगीळ ज्या नवकथेचे प्रतिनिधी आहेत त्या नवकथेला द्यायला हवे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer