विज्ञान आणि तंत्रज्ञान

लेखन रा. वि. सोवनी | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

कृषी महाविद्यालय, पुणे.

डायस्कोरिआची मशागत

राज्याच्या जंगल खात्यामार्फत डायस्कोरिआची लागवड करण्यात आली व तिचा प्रसार आता सर्व राज्यांत होऊ लागला आहे.

२. डायस्कोरिआ या नावाची एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीमधून कॉर्टिको-स्टेरॉइडे व काही संप्रेरके (हार्मोन्स)मिळतात. ही वनस्पती उत्तर हिंदुस्तानात मिळते. परंतु आता ह्या वनस्पतीची लागवड महाराष्ट्रात करण्यात यश आले आहे. राज्याच्या जंगल खात्यामार्फत डायस्कोरिआची लागवड करण्यात आली व तिचा प्रसार आता सर्व राज्यांत होऊ लागला आहे. आशी महत्त्वाची औषधी रसायने देणाऱ्या ह्या वनस्पतीचे लागवड हा प्रकल्प कक्षाने पुरा केला आहे.

३. सोनामुखीची सुधारलेली प्रत.

सोनामुखीचा उपयोग रेचक म्हणून करण्यात येतो. यातील जे कारक तत्त्व (ऍक्टिव्ह प्रिन्सिपल) आहे त्याचे प्रमाण मात्र या वनस्पतीत कमी असते. नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाकडे सोनामुखीची सुधारित प्रत तयार करण्याच्या प्रकल्प सोपविण्यात आला. या विभागाने सोनामुखीच्या बिया रुजण्यात येणारी अडचण दूर केली आहे. आता त्यापासून नव्या जाती तयार करण्यात येतील.