पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

विज्ञान आणि तंत्रज्ञान

लेखन रा. वि. सोवनी | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, मुंबई.

पाणी योजना

महाराष्ट्रात पाण्याची टंचाई वारंवार त्रास देत असते. त्यासाठी जमिनीखालच्या पाण्याचा शोध घेणे. बंधारे बांधून पावसाचे पाणी साठविणे, इत्यादी प्रकल्प चालूच आहेत. त्याशिवाय आणखी एक प्रकल्प कक्षाने यशस्वी केला आहे.

महाराष्ट्रात पाण्याची टंचाई वारंवार त्रास देत असते. त्यासाठी जमिनीखालच्या पाण्याचा शोध घेणे. बंधारे बांधून पावसाचे पाणी साठविणे, इत्यादी प्रकल्प चालूच आहेत. त्याशिवाय आणखी एक प्रकल्प कक्षाने यशस्वी केला आहे. तो असा : शहरांना व गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे मोठमोठाले जलाशय असतात. या जलाशयांमधील पाणी सूर्याच्या उष्णतेने वाफेच्या स्वरूपात वाया जाते. अशी वाफ फार मोठ्या प्रमाणात होत असते. तेव्हा ही वाफ होऊ नये यासाठी कक्षाने नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि राज्याचे जलसिंचन संशोधन व विकास खाते यांच्या मदतीने राज्यातील चार भिन्न प्रकृतीच्या प्रदेशातील जलाशयांवर प्रयोग केले. या जलाशयांवर अल्कॉक्झी एथेनॉल या द्रव्याचा एक अति पातळ थर पसरविला. ये रसायन विषारी नाही व त्याचा थर फाटत नाही. थरामुळे पाण्याची वाफ होणे फारच कमी होते. या प्रयोगामुळे एकूण दहालक्ष घनफूट (किंवा सुमारे ३३ हजार घन मीटर) पाणी वाचले. याचा खर्च सुमारे साडेआठ हजार रूपये असून या वाचलेल्या पाण्यावर दीड लाखरूपये किंमतीचा भाजीपाला पिकविण्यात यश आले आहे. आता ही योजना राज्यात इतरत्र राबविण्यात येणार आहे.

Book Home in Konkan