विज्ञान आणि तंत्रज्ञान

लेखन रा. वि. सोवनी | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

कृषी महाविद्यालय, पुणे.

शेती

तांबे, बोरॅक्स, जस्त, मॅंगनीज, लोखंड आणि मॉलिब्डिनम यांच्या संयुगांचे प्रमाण पाहाण्यात आले. संयुगे जमिनीत सूक्ष्म प्रमाणात असतात.

१. महाराष्ट्रातील शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्यातील विविध भागातील जमिनींचे नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्याचे विश्लेषण करून त्यात तांबे, बोरॅक्स, जस्त, मॅंगनीज, लोखंड आणि मॉलिब्डिनम यांच्या संयुगांचे प्रमाण पाहाण्यात आले. संयुगे जमिनीत सूक्ष्म प्रमाणात असतात. परंतु ती अशाच सूक्ष्म प्रमाणात असल्याखेरीज वनस्पतींची आरोग्यपूर्ण वाढ होत नाही. या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रातल्या शेतजमिनीचा एक परिपूर्ण तत्का तयार झाला आहे. त्याशिवाय, कोणाही शेतकऱ्याला त्याच्या शेतातील मातीचे विश्लेषन करून घेण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील हे महत्त्वाचे कार्य फक्त महाराष्ट्रातच झाले आहे हे विशेष.