MarathiMati.com - Android App on Google Play Store

शिक्षण

लेखन माधुरी शाह | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

Fergusson College, Pune in 1985 फर्गुसन महाविद्यालय, पुणे १९८५

१९४७ ते १९६० या काळात खास संस्थांमार्फत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचाही विकास झाला. माध्यमिक व माध्यमिकोत्तर पातळ्यांवर व्यवसायीकरणाची योजनाही या काळात सादर करण्यात आली.

१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराने मोठी उडी घेतली. सक्तीचे व मोफत सार्वत्रिक शिक्षण, विशेषतः मराठवाडा व विदर्भ येथील तुलनेने कमी विकसित भागाकरता आखलेले अनेक मोठे कार्यक्रम ते १९६१ मधील शिक्षण धोरणाचे एक मोठे अंग होते.

१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराने मोठी उडी घेतली. सक्तीचे व मोफत सार्वत्रिक शिक्षण, विशेषतः मराठवाडा व विदर्भ येथील तुलनेने कमी विकसित भागाकरता आखलेले अनेक मोठे कार्यक्रम ते १९६१ मधील शिक्षण धोरणाचे एक मोठे अंग होते. शैक्षणिक आढाव्याच्या आधाराने, शाळा नसलेल्या गावी स्थापन करून अनेक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात आले. अधिकाधिक विद्यार्थिनींची नावनोंदणी, शिक्षणविस्तार, प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी सुधारणा, मोफत वह्या पुस्तके व लेखन साहित्य आणि दुपारचे जेवण या सर्वांचा या कार्यक्रमात अंतर्भाव होता. दुसरे म्हणजे ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १२०० रुपयांपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांना सर्व पातळीवरील शिक्षण मोफत द्यावे असे राज्याने ठरवले. राज्याच्या या धोरणामुळे गरिबी हा शिक्षणाच्या मार्गातील अडसर होणार नाही हे निश्चित झाले. राज्याची भावी भरभराट औद्योगिकरण व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेली माणसे उपलब्ध असणे यावर अवलंबून आहे अशा धारणेमुळे तिसरी महत्त्वाची पायरी महणजे तंत्रज्ञान शिक्षणाला चालना देणे ही होती. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील ३९० कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीपैकी ३२ कोटी रुपयांची रक्कम राज्याने शिक्षणाकरिता ठेवली. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनात शिक्षणाच्या निरनिरळ्या विभागात असमान वाढ झाली असली तरी पूर्वशालेय ते विश्वविद्यालयीन शिक्षणात सर्वत्र संख्येने विपुल प्रगती जलद झाली आहे हे नमुद करणे समाधानाचे आहे.

महाराष्ट्राचे सहा व्यवस्थापकीय आणि सात शैक्षणिक विभाग आहेत. येथे ३० जिल्हे आणि २९६ पंचायत समित्या आहेत. १९८३-८४ चा लोकसंख्येचा अंदाज येणे प्रमाणे

 एकूणपुरुषस्त्रिया
(आकडे लक्षात)
महाराष्ट्र राज्य६६२.०३३४१.५२३२०.५१
नागरी२३१.९११२५.२४१०६.६७
ग्रामीण४३०.१२२१६.२८२१३.८४
नवबौद्ध धरून 
अनुसूचित जाति९०.१७४६.५२४३.५५
अनुसूचित जमाती६०.९१३१.४२२९.४९
MarathiMati.com - Android App on Google Play Store