शिक्षण

लेखन माधुरी शाह | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

Fergusson College, Pune in 1985 फर्गुसन महाविद्यालय, पुणे १९८५

डॉ. धोंडो केशव कर्वे यानी १९१६ साली सुरू केलेल्या स्त्रियांच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विश्वविद्यालयाला १९४१ साली मान्यता मिळाली.

स्वातंत्र्योत्तर काळात १९६१ पर्यंत महाराष्ट्रातील बहुसंख्य खेड्यात साक्षरतेची प्रगती एकाच वेगाने झालेली नाही. काही खेड्यांत साक्षरतेचे प्रमाण ४५% होते तर काही खेड्यांत १०% होते. बहुतेकदा स्त्रियांमधील साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या निम्मे होते आणि लहान विकेन्द्री खेड्यात ही तफावत जास्तदेखील होती. केंद्रभूत खेड्यांची लोकवस्ती जास्त व तेथे शिक्षणाच्या सोयीही अधिक असत. त्यामुळे सीमेजवळील खेड्यांपेक्षा मध्यवर्ती खेड्यांत साक्षारांचे प्रमाण महाराष्ट्रातील अनेक भागांत जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात खाजगी संस्थानी केलेले प्रयत्न व स्वयंभावी व स्थानिक संस्थानी आखलेल्या साक्षरता मोहिमा यांना चांगली फळे आली आहेत.

महात्मा गांधीनी आपली शिक्षणसुधार योजना राष्ट्रापुढे ठेवल्यानंतर महाराष्ट्रात मूलभूत शिक्षणविषयक प्रयोगांना सुरुवात झाली. पण १९४२ ते १९४६ या काळात आर्थिक, व्यवस्थापकीय व विक्रीविषयक अडचणींमुळे त्यांची प्रगती बेताची झाली शिवाय प्राथमिक शिक्षणात सर्वसामान्य प्राथमिक शाळा व मूलभूत शिक्षण शाळा यांतील तफावत पैशांची अधिकृत मदत कमी झाल्यापासून कमी झाली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात पश्चिम महाराष्टातील माध्यमिक शालान्त परीक्षा घेण्याकरता कायद्यानुसार बोर्डाची स्थापना केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विश्वविद्यालयांच्या नियंत्रणातून सुटले. खाजगी संस्थाना द्यावयाच्या देणग्याबाबत असलेल्या नियमांबरोबरच माध्यमिक शिक्षकांच्या वेतन श्रेणीची देखील पुनर्रचना करण्यात आली. एकूणचे माध्यमिक शिक्षणाचा या काळात बराच प्रसार झाला.

१९४१ साली पुणे विश्वविद्यालयाची स्थापना १८५७ साली स्थापना झालेले मुंबई विश्वविद्यालय ही त्या तऱ्हेची एकमेव संस्था होती.

डॉ. धोंडो केशव कर्वे यानी १९१६ साली सुरू केलेल्या स्त्रियांच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विश्वविद्यालयाला १९४१ साली मान्यता मिळाली. मुंबई विश्वविद्यालयाचा आरभं केवळ परीक्षा घेणारी संस्था असा झाला होता. याउलट पुणे विश्वविद्यालयाशी राज्यातली महाविद्यालये संलग्न होती व शिक्षण देणारी संस्था म्हणून त्याची स्थापना झाली होती, नागपूर व मराठवाडा विश्वविद्यालयेही स्थापण्यात आले. ३१ मार्च १९६० मधली खालील आकडेवारी उच्च शिक्षणाची जलद प्रगती दाखवते.

 संस्थाची संख्याविद्यार्थी संख्या
पुरुषस्त्रीएकंदर
विश्वविद्यालय   
विश्वविद्यालयीन विभाग२५२,१७०३७४२५४४
संशोधन संस्था१६२६९७५३४४
कला व विज्ञान६४५५,६६११७,४२४७३,०८५
शेतकी१,४६५१,४७१
वास्तुशास्त्र५२८२१५४९
उपयुक्त कला३८४१२४५०८
वाणिज्य१०८,६२४४३०९,०५४
अभियांत्रिकी३,९७८११३,९८९
कायदा४,४४१२४२४,६८३