Download MarathiMati.com's New Android App from Google Play

अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

महाराष्ट्रातील उसाचे शेत

उसाची लागवड

उसाखालची जमीन १९६०-६१ साली, १,५६,००० हेक्टर होती. ती १९८२-८३साली ३,९०,००० हेक्टरवर गेली. महाराष्ट्रात दर हेक्टरी उसाचे उत्पादन ९५,३२२ किलोग्रॅम होते.

ओलिताखालील बऱ्याचशा जमिनीत उसाची लागवड केली जाते. उसाखालची जमीन १९६०-६१ साली, १,५६,००० हेक्टर होती. ती १९८२-८३साली ३,९०,००० हेक्टरवर गेली. महाराष्ट्रात दर हेक्टरी उसाचे उत्पादन ९५,३२२ किलोग्रॅम होते. तामिळनाडू राज्य सोडले तर देशातील इतर कोणत्याही भागातील उत्पादनापेक्षा हे अधिक आहे. तामिळनाडूमधील उत्पादनही थोडेसे अधिक आहे. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या या उसापासून अनेक कारखाने साखरेचे उत्पादन करतात. यापैकी बहुतेक कारखाने शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांच्या मालकीचे आहेत. यामुळे महाराष्ट्र हे साखर उत्पादन करणारे देशातील एक प्रमुख राज्य झाले आहे. शिवाय सहकारी साखर कारखान्यांची ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला मोठाच हातभार लावला आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play