अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑगस्ट २०१३

मोटार उत्पादन: जुळणी विभाग

उद्योगांची वाढती विविधता

१९६१ साली कापड उद्योग हा राज्यातील प्रमुख उद्योग होता आणि त्यांत एकंदर औद्योगिक कामगारांपैकी जवळजवळ ५०टक्के कामगार गुंतलेले होते. १९८२ साली हे प्रमाण केवळ १८.२ टक्क्यांवर घसरले.

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असण्याचे एक कारण असे की त्या क्षेत्रात अधिकाधिक नव्या उद्योगांची भर पडत गेली आहे. १९६१ साली कापड उद्योग हा राज्यातील प्रमुख उद्योग होता आणि त्यांत एकंदर औद्योगिक कामगारांपैकी जवळजवळ ५०टक्के कामगार गुंतलेले होते. १९८२ साली हे प्रमाण केवळ १८.२ टक्क्यांवर घसरले. त्या उद्योगातील रोजगारी घटल्यामुळे हा फरक पडला नाही तर इतर नव्या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगारी निर्माण झाल्यामुळे रसायने व त्यापासून होणारी उत्पादने, औषधे, विविध प्रकारची यंत्रसामुग्री, वाहने व त्यांचे सुटे भाग, घरगुती वापराची यंत्रे, रबर, खनिज तेलांपासून निर्माण होणारी उत्पादने , साखर इत्यादि नवे उद्योग या काळात महाराष्ट्रात विकास पावले. आणि आता इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचा विकास होत आहे व त्यापासुन महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. एकत्रित विचार करता ग्राहकोप्रयोगी वस्तूंच्या उत्पादनाकडूनच भांडवली व साधनभूत वस्तूंच्या उत्पादनाच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास चालला आहे. नव्याने उदय पावणाऱ्या उद्योगाला मिळणार्‍या या प्राधान्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील उद्योजकांचा व शासनाचा आधुनिक व प्रागतिक दृष्टिकोन.

उद्योगांच्या जा जोमदार वाढीचे श्रेय काही अंशी मुंबई शहराला द्यायला हवे. नव्या उद्योगांना आकर्षित करणऱ्या या लोहचुंबकाचे कार्य ते बजावीत आले आहे. या शहरात व त्याच्या आसपास चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. उद्योगांच्या तांत्रिक, व्यापारे वैत्तिक गरजा भागविण्यासाठी येथे चांगली सोय आहे. कुशल कामगारांचा भरपूर पुरवठा या शहरात आहे आणि तसेच एक फार मोठी बाजारपेठही आहे विशेष म्हणजे उद्योजकता व व्यापार यांना अत्यंत अनुकूल असे वातावरण येथे आहे. नव्या कल्पनांचे आणि उपक्रमशीलतेचे येथे स्वागत होते. स्पर्धा आणि व्यापारी मनोवृत्ती या नगराच्या रक्तात भिनलेली आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा