अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑगस्ट २०१३

जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा, नागोसली(तालुका: ईगतपूरी, जिल्हा: नाशिक)

साक्षरता

प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १९६०-६१ साली ४१ लाख होती ती १९८३-८४ साली ९० लाखांवर गेली.

जनगणनेतील आकडेवारीवरून असेही आढळून येते की महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण एकंदर देशात मानाने पुष्कळच अधिक आहे. अखिल भारतातील साक्षरतेचे प्रमाण मात्र ४७.१८ टक्के होते. शिक्षण ही आर्थिक व सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे अशी भावना महाराष्ट्रात पहिल्यापासूनच आहे व राज्य सरकार आपल्या उत्पन्नातील बरीच मोठी रक्कम शिक्षणासाठी खर्च करते. त्यामुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १९६०-६१ साली ४१ लाख होती ती १९८३-८४ साली ९० लाखांवर गेली. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थातील विद्यार्थ्यांची संख्या देखील १,१०,००० वरून ७,०५,००० झाली म्हणजेच सहापटीहूनही अधिक वाढली.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा