MarathiMati.com - Android App on Google Play Store

अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

इगतपूरी तालुक्यातील घोटी या गावाचे एक वीहंगम दृश्य.

वाहतूक

महाराष्ट्रात दर १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरीने ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत.

महाराष्ट्राच्या काही भागात रेल्वे वहातुकीच्या बऱ्यापैकी सुविधा असल्या तरी कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशातील काही भागात अधिक रेल्वे मार्गाची गरज आहे. रस्त्यांच्या बाबतीत देखील परिस्थिती असावी तितकी समाधानकारक नाही. महाराष्ट्रात दर १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरीने ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९५ किलोमीटर तर पंजाबात ९१ किलोमीटर आहे. १९६१-८१ या कालखंडातल्या सुधारित रस्ता बांधणीच्या योजनेत जी लक्ष्ये ठरविलेली होती ती राज्याने अजूनही गाठलेली नाहीत. राज्याचा आर्थिक विकास व वापरात असलेल्या मोटारी [दर लाख लोकसंख्येमागे १,३२८] या गोष्टी विचारात घेता. रस्ता बांधणीच्या कामात झपाट्याने प्रगती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची रूंदी आणि मजबूती वाढवणे व त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे वाढवणे देखील आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने उतारूंच्या वहातुकींसाठी राज्यभर वाहन व्यवस्था केली आहे. मात्र या संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यास व खर्च कमी करण्यास पुष्कळच वाव आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा

MarathiMati.com - Android App on Google Play Store