MarathiMati.com - Android App on Google Play Store

अर्थव्यवस्था आणि उद्योग

लेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८

विजेचा खांब

ऊर्जा

महाराष्ट्रात विजेचा पुरेसा पुरवठा आहे आणि इतर अनेक राज्यात जशी वीज पुरवठ्यातील कपात ही नित्याची गोष्ट झाली आहे तशी परिस्थिती सुदैवाने महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राची वीज उत्पादनाची क्षमता ९६०-६१ साली केवळ ७५९ मेगॅवॉट होती.

वहातुक, वीज पुरवठा, व्यापार व वीज पुरवठ्यांची यंत्रणा वगैरे मूलभूत सुविधांच्या उपलब्धीवर आर्थिक विकास अवलंबून असतो. महाराष्ट्रात विजेचा पुरेसा पुरवठा आहे आणि इतर अनेक राज्यात जशी वीज पुरवठ्यातील कपात ही नित्याची गोष्ट झाली आहे तशी परिस्थिती सुदैवाने महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राची वीज उत्पादनाची क्षमता ९६०-६१ साली केवळ ७५९ मेगॅवॉट होती. ती १८८२-८३ साली ४,६८६ मेगॅवॉट झाली. म्हणजे खूपच वाढली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे इतर राज्यातील तशाच संघटनांपेक्षा अधिक कार्यक्षम आहे हेच ही गोष्ट दाखविते. टाटांच्या मालकीची वीज केंद्रे देखील कार्यक्षम आहेत. मुंबईत आणि तिच्या परिसरात वीज पुरवठा पुरेसा, नित्य आणि सुरळीतपणे मिळतो. पण राज्याच्या इतर भागात मात्र परिस्थिती इतकी समाधानकारक नाही. पुरवठा मध्येच बंद पडणे, त्याचे व्होल्टेज कमीअधिक होणे हे प्रकार वारंवार घडत असतात. शिवाय राज्यातील विजेची मागणी सारखी वाढतेच आहे. वाढत रहाणार आहे. म्हणून वीज उत्पादनाची क्षमता पुरेसा प्रमाणात वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत, नाही तर भावी काळात इतर राज्यांप्रमाणेच वीज टंचाईला तोंड द्यावे लागेल.

सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store