महालक्ष्मी व्रत

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ डिसेंबर २०१२

महालक्ष्मी व्रत | Mahalaxmi Vrat

महालक्ष्मी व्रत केल्याने आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा होते, संसारात सुखसमाधान प्राप्त होते, या श्रध्देने मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवार पासून ते शेवटच्या गुरूवार पर्यंत हे महालक्ष्मी व्रत स्त्रीया करतात.

॥ ॐ र्‍हीं महालक्ष्मीदेव्यै नम: ॥
महालक्ष्मी व्रत (श्रीमहालक्ष्मी व्रत)

अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुखसमाधान सतत रहावे, हा त्यामागील हेतू असतो. व्रत केल्याने उत्तमफलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करुन शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे.

शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रध्दा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.

महालक्ष्मी व्रत - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे