महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ डिसेंबर २०१२

महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी | Mahalaxmi Vrat - Pujechi Mandani

महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी - [Mahalaxmi Vrat - Pujechi Mandani] महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी या संदर्भातील माहिती.

महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी?

 • घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी.
 • पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा.
 • चौरंगावर कोरे(नवीन कापड) अंथरावे.
 • कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालावी.
 • त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
 • कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी.
 • विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
 • चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा.
 • घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये.
 • मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.
 • त्याचेवर शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.

अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी.
पूजेनंतर आरती करावी.
सर्वांना प्रसाद द्यावा.
पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा.
त्यानंतर भोजन करावे.
दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे.
पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे.
तिला हळदी-कुंकू वहावे आणि नमस्कार करावा.

पद्मपुराणात या महालक्ष्मी व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मीदेवीने असे कथन केले आहे की, ‘माझे हे व्रत जो नित्य नेमाने करील, तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे!’

महालक्ष्मी व्रत - पूजेची मांडणी - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे