MarathiMati.com - Android App on Google Play Store

महालक्ष्मी व्रत – नियम

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ डिसेंबर २०१२

महालक्ष्मी व्रत – नियम | Mahalaxmi Vrat - Niyam

महालक्ष्मी व्रत – नियम - [Mahalaxmi Vrat - Niyam] महालक्ष्मी व्रत आरंभ करण्यापूर्वी काही नियमांचे पालन केल्यास हे व्रत अधिक लाभदायक ठरते.

गुरुवारी प्रात:काळी उठावे. अंघोळ करावी. शुध्द अंत:करणाने व सश्रध्द भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करुन, सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी-कधी आकस्मिक अडचण उद्भवते; अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा- आरती करुन घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास पक्त पूजा, आरती करावी. कहाणी स्वत: वाचावी अथवा ऎकावी. व्रताची पूजा व कहाणी ऎकण्यास शेजार्‍यांना निमंत्रण द्यावे.

सायंकाळी गाईची पूजा करावी. तिला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा, आरती करावी. कहाणी वाचावी. सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी-कुंकू द्यावे. एक-एक फळ व व्रताच्या कथेची एक-एक प्रत द्यावी. शक्य झाल्यास ब्राम्हणांना शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रतास सुरवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसर्‍या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरु करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. हमखास यश लाभते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store