रांगोळी संग्रह

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१०

रांगोळी संग्रह | Maharashtrian Rangoli Patterns and Designs Gallery

रांगोळी संग्रह - [Rangoli Collection] आपल्यासाठी प्रेरणादायक सुंदर आणि सोप्या मराठमोळ्या रांगोळ्यांचे डिझाइन्स [Maharashtrian Rangoli Patterns and Designs Gallery].

भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपारिक कलाप्रकार, पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा सामावेश होतो. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्व आहे. रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. भारतासहित अनेक देशांमध्ये या कलेचा प्रसार झालेला आहे. हिंदू धर्मात दैनदिन कार्यात रांगोळीच महत्व तर आहेच पण धार्मिक कार्य व सण यामध्ये तीच असाधारण अस महत्व आहे. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. साधारणता रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फुल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पाऊले, सुर्य देवेतेचे प्रतिक, श्री, कासव इ. मांगल्यसुचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयक हि रांगोळ्या काढल्या जातात. पूर्वी सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढली जायची. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोधार अंगण रंगवून किंवा फरची किंवा टाईल्स बसवली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या छापे किंवा कोन यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात. विशेष म्हणजे रांगोळ्या काढण्याची स्पर्धाही भरवल्या जातात.

रांगोळी | Rangoli Pattern Design
रांगोळी | Rangoli Pattern Design