NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

खंडोबाची स्थाने

Khandoba Places | Maharashtra

म्हाळसाकांत खंडोबा

Khandoba Jejuri

सर्वसाधारपणे प्रत्येक घराण्यात पूर्वापार पद्धतीनुसार कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कुलस्वामिनी व कुलदैवत हे कुटुंबाचे दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी इ. पैकी एक कुलस्वामिनी असते. तसेच ज्या कुटुंबामध्ये एक कुलस्वामी जसे खंडोबा हे दैवत असते.

कुलदैवत व कुलस्वामिनी हे त्या त्या घराण्याची भरभराट, समृद्धी, सुखशांती देणारे आणि संरक्षण करणारे आहेत ही त्यामागची भावना. या भावनेमधून प्रत्येक व्यक्तीमध्ये या देवतांच्याविषयी अढळ श्रद्धा दिसून येते. कुठल्याही आरंभलेल्या शुभकार्याचे यशाचे श्रेय हे या तिन्ही देवतांना दिले जाते व योग्यच आहे.

कर्ता करविता कुलस्वामीच आहे व व्यक्ती हे निमित्तमात्र आहे. ही भावना व्यक्तीच्या मनात दृढ असते. तेव्हा संकटकाळी तारणारा कुलस्वामी आहे. यातून बहुतेक कुटुंबात आणि व्यक्तीच्या श्रद्धेमुळे खंडोबाची उपासना केली जाते. यासाठी खंडोबा दैवताविषयी पौराणिक माहिती समजून घेणे आवश्यक आहे.

या कलीयुगात मनुष्याच्या हातून लहान-मोठी अनेक पापे कर्मे सदैव होत असतात. अशा पाप कर्मातून मणिमल्ल आणि मल्लासुर हे दोन दैत्य बृहदेवाच्या वराने उन्मत्त होऊन मृत्यू लोकातील ऋषिजनांना त्यांनी आरंभिलेल्या धार्मिक कार्यामध्ये विघ्ने आणून उपद्रव देऊ लागले, तेव्हा या दोन दैत्यांचा संहार करण्याचे दृष्टीने ब्रह्मदेव, विष्णू आणि इन्द्र हे भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी सांगितलेल्या निवेदनावरून हे दोन दैत्य ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा दुरुपयोग करीत आहेत तेव्हा त्यांचा संहार करणेच योग्य आहे अशा भावनेतून श्री शिवशंकर क्रोधायमान झाले व त्यांनी जटा आपटून भयंकर अशा ध्रुतमारीची उत्पत्ती केली व स्वतः मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. तो दिवस चैत्री पौर्णिमेचा होता. त्यानंतर वीरभद्र, कार्तिकेय व महागणपती यांच्या अधिपत्यखाली त्यांच्या एकूण सातकोटी (येळकोट) शिवगणासह मार्तंड भैरव हे मणिमल्ल व मल्लासुर या दैत्यांचा नाश करण्यासाठी लढाईस तयार झाले. ह्या घनघोर लढाईत मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते षष्ठी या दिवशी मार्तंड भैरवाकडून हे दोन दैत्य मारले गेले. त्यामुळे षष्ठी या चंपाषष्ठी संबोधण्यात येऊ लागले व लोक मल्हारी मार्तंडाचे नवरात्र मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु. षष्ठी असे बसवू लागले. चैत्री पौर्णिमेस श्री भगवान शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. त्यांचे वाहन नंदी असून मार्तंड भैरव यांना ४ हात असून त्यामध्ये खड्‌ग, डमरू, त्रिशूळ आणि पानमात्र असे त्यांनी धारण केलेले आहे. त्यांचे पायाशी मणिमल्ल आणि मल्लासूर यांची मुंडकी आहेत. त्यानंतर मगशीर्ष शु. ६ ( चंपाषष्ठी ) या दिवशी ते मल्हारी मार्तंड या नावाने जेजुरी जवळील कडेपठारावर प्रकट झाले. यास एक पौराणिक कथा आहे. ती अशी - मार्तंड भैरवाने मणीस जमिनीवर पाडले एवढ्यात मणी दैत्याने एक वर मगितला. ``माझे शीर तुझे पायाखाली नित्य असू दे आणि माझे अश्वारूढ रूपही तुझ्या सान्निध्यात राहू दे. ''तसेच मल्ल दैत्याला मार्तंड भैरवाने खाली पाडले तेव्हा मरण्यापूर्वी तोही मार्तंड भैरवाला म्हणाला ``देवा माझे नांव तुझ्या नावाचे आधी असावे'' मल्हारी म्हणजेच मल्ल अधिक अरी. दोघांच्या विनंतीस मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले.

मल्हारी मार्तंडाचा एक भक्त दर रविवारी कडेपठार येथे दर्शनासाठी जात असे. वयोमानानुसार मार्गाच्या अर्ध्या वाटेवर असलेल्या घोडे उड्डाणाच्या पुढे त्यास पुढे जाणे कठीण झाले. ही अवस्था पाहून मल्हारी मार्तंडाने त्या भक्तास दृष्टांत दिला की, तुला यापुढे माझे दर्शनासाठी एवढ्या लांबवर येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी मीच तुझ्या दर्शनासाठी कडेपठार सोडून नवलाख पायऱ्या असलेल्या टेकडीवर सयंभू लिंग म्हणून प्रकट होत आहे. या ठिकाणालाच सध्याचे जेजुरी देवस्थान म्हणतात.

१२ ज्योर्तिर्लिंगे, अष्टविनायक, ११ मारुती, ३॥ देवीची पीठे, याचप्रमाणे महाराष्ट्रात ७ व कर्नाटकात ५ अशी खंडोबाची १२ तीर्थक्षेत्रे आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी खंडोबा या नावाने व कर्नाटकातील रहिवासी श्री. मल्ल्या या नावाने ओळखतात.

जेजुरीJejuri Khandoba

हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका

निमगाव दावडी तीर्थक्षेत्र

सदरचे देवस्थानाचे बांधकाम हेमाडपंथी असून सदरच्या परिसरात २५ दगडी कमानी आहेत. सदर ठिकाणी मार्गशीर्ष शु. प्रतिप्रदा ते चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र उत्सव असतो


MarathiMati.com - Android App on Google Play Store