Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

अंगण आणि प्रवेशद्वार

angan praveshdwar

Hindu Home

अंगण आणि प्रवेशद्वार

कुंपणभिंतीपासून मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंतचा मोकळा भाग म्हणगे अंगण. आजकाल मोठमोठ्या कंपन्या, कार्यालये यांत एक स्वागतकक्ष असतो व स्वागत करण्यासाठी तेथे बहुधा एखादी स्वागतसुंदरी असते. स्वागतसुंदरी ‘ सुंदरी ’ असो वा नसो, पण प्रसन्न, नीटनेटकी, चटपटीत व ३-४ भाषा बोलू शकणारी असावी लागते. तसेच तिला, ती ज्या कार्यालयात काम करीत असेल, त्याची माहितीही असावी लागते. स्वागतकक्षाच्या रचनेवरून व व्यवस्थेवरून त्या कार्यालयाचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

घराचे अंगण हाही एक प्रकारे घराचा स्वाघतकक्षच असतो व तिथे रेखाटली गेलेली रांगोळी ही स्वागतसुंदरी असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणूनच ते अंगण समतल, स्वच्छ, नीटनेटके असेल, चारदोन फुलझाडे अंगणात असतील. या फुलझांडात देवतातुल्य तुळस असेल. घरातील तुळशीला पाणी घालणे सुनालेकींना सोपे जावे म्हणून महाराष्ट्रात तुळशीवृंदावन मागील अंगणात असते. पण गोवा व दक्षिण भारतात बव्हंशी ते पुढच्या अंगणात असते, किंबहुना गोव्यात तुळशीवृंदावन ही हिंदू घराची एक खूणच बनली आहे. तुळस ही हवा शुद्ध करणारी आणि अनेक औषधी उपयोग असलेली वनस्पती आहे. अंगणात सुंदरशी रांगोळी काढलेली असेल, तर प्रवेश करणाराचे मन प्रसन्न व आनंदित होते. बाहेरच्या धकाधकीच्या जीवनातील संघर्ष, चिंता, काळज्या यांचा ताण कमी होण्यास यांची मदत होते. दुष्ट विचार जरा थबकतात.

घरातील गृहिणीने पहाटेच्या वेली संडासंमार्जन करून रांगोळि काढावी, ही पद्धती मोठी सार्थ आहे. त्याने आलेला अतिथी तर खूष होईलच, पण सकाळच्या शुद्ध, मोकळ्या, आल्हाददायी वातावरणाचा परिणाम म्हणून ती गृहिणीही आनंदित होईल व प्रसन्नतेने सुरू झालेल्या दिवसावर तो आनंद पसरून राहील. दिवसभर विविध कामांच्या रेट्यात गुंतलेल्या गृहिणीच्य कलाविष्काराला सकाळी सकाळीच संधी मिळेल. रांगोळीची रेघ बारीक व नीटनेटकी असेल तर त्यावरून घरातील गृहिणी टापटिपीने संसार करणारी असेल हे लक्षात येते. एखाददुसरी रेघ पुसल्यासारखी दिसत असेल तर समजावे की, त्या घरात छोटे मूल आहे. रांगोळीला अगदी खेटून पुरुषी चपला वा बूट दिसले की समजावे, गृहस्थ गृहिणीची कदर बाळगणारा नाही. अंगणात येणाराला ठेव लागू नये अशी काळजी घ्यावी ठेच लागली तर घरात शिरण्याआधीच मन दुखावलेले असते व घरातल्यांबद्दलची सहानुभूती नष्ट झालेली असेल. पूर्वी असे सारे बारकावे घरातील आई या आजी मुलीला सांगत असत.

अजून काही घरांत रांगोळीची पद्धत आहे. काही घरांच्या प्रवेशद्वाराजवळच लहानमोठी काळी फरशी मुद्दाम रांगोळीसाठी बसवलेली असते. रांगोळीने रांगोळी काढायची पद्धत कमी झाली असली तरी रांगोळीचे स्टिकर्स चिकटविलेले असतात.

पूर्वी पुष्कळदा घराच्या अंगणात एक छोटीशी मोरी असावयाची व तेथे पाय धुवून घरात प्रवेश करावा, अशी पद्धत असे. आरोग्याच्या दृष्टीने ते किती आवश्यक आहे हे सांगायला नकोच. आजही गुरुद्वारांसमोर तशी व्यवस्था असते. घरात बाळंतीण असेल तर आजही पाय धुतल्याविना तिच्याजवळ जात नाहीत. पण हे सगळे वयस्क लोकच पाळताना दिसतात.

आज घराला अंगण असतेच असे नाही. फ्लॅट पद्धतीत तर दाराबाहेर रांगोळी काढायलाही जागा नसते. घरातले केरवारे मोलकरणींच्या हातात असतात. ती येईल तेव्हा केर निघतात. रांगोळी काढणे जुनाटपणाचे लक्षण मानले जाते. बाहेरचे चपला-बूट घालूनच घराच्या आंतर्भागातही वावरणे हे सुधारलेपणाचे लक्षण मानले जाते. एकदा एक कार्यकर्ती जम्मूत एका घरी गेली होती. ते थंडीचे दिवस होते. कार्यकर्ती दारात चपला काढू लागल्याबरोबर घरातील गृहस्थ म्हणाले, “ चपला पायांत राहिल्या तरी चालतील ” समोरच दोन लहान मुले खेळत होती. एक रांगणारे होते. दुसरे दोन-अडीच वर्षांचे होते. त्या कार्यकर्तीने चपला काढल्या व म्हणाली, “ या मुलांसाठी तरी मला चपला काढल्या पाहिजेत. चपलांना लागलेली घाण घरात आली तर छोट्या मुलांना त्रास होईल. ”

याउलट जपानचा अनुभव. तेथे आपण घरात शिरलो की, घरातील गृहिणी आपल्यासमोर आपल्या पायात येईल असा स्लीपर जोड ठेवते व आपण काढलेल्या चपला बाहेर पडताना घालायला सोप्या पडतील, अशा रीतीने ठेवते.

दुसरे स्वागत होते ते प्रवेशद्वारावरील तोरणाने. पूर्वी हे तोरण आंब्याच्या पानांचे असावयाचे. आता लोकरीचे, प्लॅस्टिकच्या मण्यांचे वा काचेच्या नळ्यांचे असते. पण पुष्कळदा दारे आत उघडणारी असतात. बाहेर लावलेले तोरण चोरीला जायची भीती असते. त्यामुळे बैठक खोलीच्या दुसऱ्या दाराला ते लावलेले आढळते. पण ही पद्धती सर्वत्र आढळत नाही. दरवाज्याजवळ विघ्नहर्त्या व सुखकर्त्या गणपतीचे चित्र असलेली टाईल लावलेली असते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer