Marathi Entertainment

ऑन ड्युटी २४ तास

On Duty 24 Taas

ऑन ड्युटी २४ तास संजीवनी जाधव खास बातचीत | Sanjivani Jadhav Interview for On Duty 24 Taas

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास" तर्फ़े एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला २ मिनिटांच्या ध्वनिफ़ितीवर एक पोलिसांवर आधारित चित्रफ़ित तयार करायची आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम १० चित्रफ़ितींमधून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकास विजेता म्हणून घोषित करतील.

विजेत्या चित्रफ़ितीला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट "ऑन ड्युटी२४तास"च्या नामावली दरम्यान दाखविण्यात येईल तसेच विजेत्याच्या नावाचाही त्या नामावलीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
३० नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असून त्या नंतर कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही.

इच्छुक स्पर्धकांनी ध्वनिफित आणि फॉर्म साठी kedar.onduty24@gmail.com वर संपर्क साधावा.

स्पर्धेचे नियम आणि अटी पुढीलप्रमाणे:-

१. स्पर्धकांकडून एकाच प्रवेशिकेस परवानगी
२.चित्रफ़ित ही डिव्ही अथवा एचडिव्ही स्वरूपात असावी.
३.स्वतःच चित्रीकरण केलेले शॉट्सचा समावेश असावा अन्यथा कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याबद्दल कारवाई होऊ शकते.
४.चित्रफ़ितीबरोबरच प्रवेशिका अर्ज असणे अनिवार्य आहे.
५.सर्व अर्थिक जबाबदारी ही स्पर्धकांची राहील.
६.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७. स्पर्धकांनी सोबत आपले ओळखपत्र जोडावे.

आपल्या चित्रफ़िती पुढील पत्त्यावर पाठवा.

केदार शिंदे प्रॉड्क्शन

बिल्डींग नं ५८, रूम नं २६१३

रविकीरण हाऊसिंग सोसायटी,

गांधी नगर,बांद्रा(पूर्व)

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony