NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

बापलेकीचा - एकूलती एक चित्रपट

Ekulati Ek - Marathi Movie

- स्वप्नाली अभंग

बापलेकीचा - एकूलती एक चित्रपट | Ekulati Marathi Movie

पुढच्या पिढीने मागच्या पिढीचा वारसा चालवणे हे काही आपल्याकडे नवीन नाही. अनेक कलाकारांची मुले आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेऊन या क्षेत्राकडे वळताना दिसतात. हिंदी चित्रपट सृष्टीत अशी अनेक उदाहरणे सापडतात मात्र मराठीत अशी उदाहरणे तुरळकच दिसतात. मात्र आता या नामावळीत आता सचिन पिळगावकरची कन्या श्रिया पिळगावकर या नवोदित अभिनेत्रीचे नाव आता सामील झाले आहे. आगामी ‘एकलूती एक’ या चित्रपटाद्वारे श्रिया मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. वडील आणि मुलगी यांच्या भावस्पर्शी नात्यावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटात दोघेही प्रमुख भुमिकेत असून चित्रपटातही सचिन आणि श्रिया यांनी वडील आणि मुलीचीच व्यक्तिरेखा साकरत आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात अशोक सराफ, किशॊरी शाहाणे आणि सिध्दार्थ मेनन यांच्या प्रमुख भुमिका आहेत. चित्रपटाची कथा सचिन पिळगावकर यांची असून पटकथा सचिन आणि क्षितिज झारापकर यांनी लिहीली आहे. संवाद इरावती कर्णिक यांचे असून जिंतेद्र कुलकर्णी यांनी आजच्या तरूणाईला भावणारी ह्र्दयस्पर्शी गाण्यांचा स्वरसाज चढवला आहे.

श्रियाचा जरी हा पहिलाच चित्रपट असला तरी याआधी ही तीने काही चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता तर वडिलांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करण्याची संधी मिळाल्याने श्रिया खूष आहे. दररोज नवीन काहीतरी सेटवर शिकायला मिळत असल्याचं श्रियाने सांगितले. सचिनचे वडील शरद पिळगावकर हे प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि वितरक होते. सचिननेही वयाच्या पाचव्या वर्षी ‘हा मार्ग माझा एकला’ या चित्रपटातल्या भूनिकेने सर्वांची मनं जिंकली होती. अभिनेता, गायक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भुमिकांमधून सचिनने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आणि आता श्रियाने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या आधी ही आपण उदयोन्मुख कलाकारांना संधी दिली आहे पण श्रिया केवळ स्वत:ची मुलगी आहे म्हणून नव्हे तर तिच्यातले कलागूण पाहूनच तिला संधी दिल्याचं सचीनने सांगितलं. हा चित्रपट २३ मे ला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.


MarathiMati.com - Android App on Google Play Store