Download MarathiMati.com's New Android App from Google Play

टी २० परिक्षा

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जानेवारी २०१७

टी २० परिक्षा - मराठी विनोद | T-20 Pariksha - Marathi Jokes

(गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला)
गुरूजी(अतिउत्साहात): मुलांनो, सध्या ‘क्रिकेटचा टी २०’ प्रकार खुपच फॉर्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर ‘टी २०’ सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?
(पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना)
बऱ्याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.
गुरूजी(नकारात्मक स्वरूपात): हा लवकर सांग काय सांगायचे ते.
बंड्या(गंभीर मुद्रा करून सांगु लागला): गुरूजी परीक्षा १ तास २० मिनिटांची असली पाहीजे
गुरूजी: ठीक आहे, पुढे ?
बंड्या: दर २० मिनिटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनिटाचा ‘टाईम ऑफ’ असला पाहीजे.
गुरूजी(टेंशन मध्ये): बरं पुढे ?
बंड्या: पहिले ३० मिनिटे ‘पॉवर प्ले’ असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील.
(गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला)
बंड्या: प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न ‘फ्री हिट’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत.
(गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले)
बंड्या: ...आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर गर्ल्स नी वर्गात येऊन २ मिनिटे डान्स केला पाहिजे.
(पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले)
गुरूजी कायमचे ‘पॉवर प्ले’ मध्ये (वर्गाबाहेर) गेले...

Download MarathiMati.com's New Android App from Google Play