पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

अरे हा तर चमत्कार

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २०१७

अरे हा तर चमत्कार - मराठी विनोद | Are Ha Tar Chamatkar - Marathi Jokes

रामू मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक - दोन पेग रोज पोटात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतुन ठेवायचा. मालकाला त्याचा संशय यायचा.
एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते, त्यांनी तेथूनच किचनमध्ये असलेल्या रामूला जोरात हाक मारली.
मालक(ओरडून): रामूऽऽऽ
रामू(किचनमधून): काय मालक
मालक: माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पितो ?
(किचनमधून काहीच उत्तर आले नाही)
मालकाने तोच प्रश्न पुन्हा विचारला पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.
मालक रागातच किचनमध्ये गेले आणि रामूला म्हणाले: हे काय चाललंय ? मी तुला हाक मारली तर ओ देतोस पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस, असे का ?
रामू: मालक किचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते, बाकी काहीच ऐकू येत नाही.
मालक: हे कसे शक्य आहे? ठिक आहे, आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार आणि बघच मी तुला खोटा पाडतो ते.
(रामू ड्राइंग रुममध्ये मालकीणीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो)
रामू: मालकऽऽऽ
मालक: हां बोल रामू
रामू: आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला ?
(किचनमधून काहीच उत्तर आले नाही)
रामू: तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते ?
(किचन पुन्हा शांतच)
मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले, “अरे, हा तर खरोखर चमत्कार आहे, किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे; बाकी काहीच ऐकू येत नाही.”

Book Home in Konkan