आता तुमचा नंबर बरं का

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ डिसेंबर २०१६

आता तुमचा नंबर बरं का - मराठी विनोद | Aata Tumacha Number Bara Ka - Marathi Jokes

सोनी: शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या, कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या, “आता तुझा नंबर बरं का!”
मोनी: मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली ?
सोनी: त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे...
“आता तुमचा नंबर बरं का!”