MarathiMati.com - Official WhatsApp Number

आमच्या मळ्यातली मेथीची भाजी

प्रकाशन: संपादक मंडळ| २५ डिसेंबर २०१६

आमच्या मळ्यातली मेथीची भाजी - मराठी विनोद | Aamachya Malyatali Methichi Bhaji - Marathi Jokes

जावई पहिल्यांदा सासुरवाडीला जातो...
तिथे त्यांचे स्वागतही मस्त होते...
पण दुपारी जेवणातं त्याला न आवडणारी ‘मेथीची भाजी’ असते.
पहिलाच दिवस, म्हणून बिचारा गुपचुप खातो...
सासूबाई वरून कौतुकाने सांगतात...
“आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही”
रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय...
‘मेथीचे पिठले’
एकदा बायकोकडे पाहत, गपगुमान गिळतो
दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा ‘मेथीचे वरण’
आता मात्र आपल्या सुंदर बायको कडे पाहून बिचारा संयम बाळगतो
सायंकाळी मात्र तो स्वतःच सासूबाईंना सांगतो...
“रात्रीचा माझा स्वयंपाक करू नका, तुमचा तो मेथीचा मळा कुठे आहे तेवढं सांगा; मीच तिथे जाऊन चरून येतो”

Book Home in Konkan