एक लाख रुपयाची लॉटरी

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ डिसेंबर २०१६

एक लाख रुपयाची लॉटरी - मराठी विनोद | Ek Lakh Rupayachi Lottery - Marathi Jokes

स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.
जोशी काका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना एक लाख रुपयाची लॉटरी लागलीये !
जोशी काका: मग तुम्हाला का इतका आनंद झालांय ?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीए !