चहाची ऑर्डर

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ नोव्हेंबर २०१६

चहाची ऑर्डर - मराठी विनोद | Chahachi Order - Marathi Jokes

मुंबईतल्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये पहिल्यांदाच गेलेल्या एका पुणेरी माणसाने चहाची ऑर्डर दिली...
वेटरने उकळलेला कोरा चहा, साखर आणि गरम दुध आणून दिले...
पुणेरी माणुस कसाबसा चहा पिऊन संपवतो न संपवतो तोच त्याला वेटरने विचारले, “साहेब, आपण अजुन काही घेणार का?”
पुणेरी माणूस: “भजी खायची होती रे! पण तु कढई, तेल, बेसन आणि कांदे आणून ठेवशील... जाऊदे”