MarathiMati.com - Android App on Google Play Store

किर्तनकारांचे गुपीत ज्ञान

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ नोव्हेंबर २०१६

किर्तनकारांचे गुपीत ज्ञान - मराठी विनोद | Kirtankaranche Gupit Dnyan - Marathi Jokes

किर्तनकार: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?
मुलं (एका स्वरात): लोखंड
कीर्तनकार: दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड ?
गण्या: नाही महाराज लोखंडंच जड.
किर्तनकार (गोंधळलेल्या स्वरात): अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
मंग्या: नाही महाराज लोखंडंच जड.
किर्तनकार (चिडून): गधड्या दोघांचाही वजन सारखंच आहे.
पक्या (मिश्लिक हास्य देत): तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा, मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो.
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.
महाराज किर्तन सोडून विण्यासह फरार.
गण्या, मंग्या आणि पक्या हसुण - हसुन बेजार...

  • TAG
MarathiMati.com - Android App on Google Play Store