स्वर्गातल्या अप्सरा आणि माकड

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ नोव्हेंबर २०१६

स्वर्गातल्या अप्सरा आणि माकड - मराठी विनोद | Swargatalya Apsara Aani Makad - Marathi Jokes

बायको: अहो, ऐकलंत का? मी काय म्हणतेयऽऽऽ नवरा जर मेला तर, त्याला स्वर्गात गेल्या नंतर म्हने अप्सरा मिळतात... हे खरंय का?
नवरा: हो तर...
बायको: आणि बायको मरून स्वर्गात गेल्या नंतर बायकोला कोण भेटतं?
नवरा(एकदम मुडमध्ये येऊन): बायकोला का? बायकोला तिथे माकडं भेटतात...
बायको: जळलं मेलं जीणं ते, असं कसं बायकांचं नशीब?
इथं बी माकडं अन तिथं बी माकडंच.