जागतिक महिला दिवस - ८ मार्च

जागतिक महिला दिवस - ८ मार्च | 8th March - International Women's Day
जागतिक महिला दिवस - ८ मार्च. छायाचित्र: हर्षद खंदारे

जागतिक महिला दिवस - ८ मार्च - [8th March International Women's Day] महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.

पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री - पुरुष विषमतेचे एक उदाहरण म्हणजे जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये ‘क्लारा झेटकिन’ या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिवस’ म्हणून क्लाराने मांडलेला ठराव पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या.


“आजची स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे” किती विरोधाभासाने भरलेले वाक्य आहे हे ! आजही एका स्त्रीला तिची योग्यता, कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरूषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघीतले जाते.

देश स्वतंत्र झाला. पुरूषांसोबतच स्त्रीयांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आजही आपल्याला सहज दिसुन येते. कारण आजही स्त्री पुरुष विषमता आहे. आजच्या सोकॉल्ड स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला दिसून येत नाही.

आजच्या स्त्रीने आपल्या भावना, विचार, कौशल्य हे विविध माध्यमांतून बोलत्या करणे गरजेचे आहे. मराठीमाती डॉट कॉम चे हे मुक्त व्यासपीठ माझ्या सर्व सख्यांसाठी नेहमीच खुले असेल.

- स्वाती खंदारे
(संपादिका)
मराठीमाती डॉट कॉम
आपला सहभाग नोंदवाआम्हाला संपर्क करा

स्त्री शक्ती - मराठी कविता | Stree Shakti - Marathi Kavita

स्त्री शक्ती

मराठी कविता

स्त्री शक्ती
ऐक तुझी कहाणी
तु कुणाची माता
तर कुणाची भगिणी

अधिक वाचा

गर्भातली कळी - मराठी कविता | Garbhatali Kali - Marathi Kavita

गर्भातली कळी

मराठी कविता

गर्भातली मी कळी
घ्या मला जवळी
नका अशी धिक्कारु मला
जरी असेल मी मुलगी

अधिक वाचा

स्त्री आदर - मराठी कविता | Stree Aadar - Marathi Kavita

स्त्री आदर

मराठी कविता

ठेऊन भान महापुरूषांचे
आदर स्त्रीचा कर जरा
पुन्हा ताठ मानेने जगण्यासाठी
प्रोत्साहित आता कर तिला

अधिक वाचा