मासिक राशिभविष्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २०१८

मासिक राशिभविष्य | Monthly Horoscope in Marathi - Masik Rashi Bhavishya in Marathi

मासिक राशिभविष्य - [Monthly Horoscope/Masik Rashi Bhavishya in Marathi].

दैनिक राशिभविष्य | साप्ताहिक राशिभविष्य | मासिक राशिभविष्य | वार्षिक राशिभविष्य


मेष

नोकरीत उन्नती संभव. प्रसुतीत अडचणी उद्भवण्याची शक्यता. अपघातातून बचाव होईल. वैवाहिक जोडीदाराशी पटेल.

वृषभ

सौंदर्यसाधनेचे फायदे होतील. नाट्य - सिने व कला क्षेत्रात प्रगती साधेल. अनैतिक गोष्टीत पाऊल पडण्याची शक्यता. नोकरी साधेल.

मिथुन

चेहर्‍याचे पुरळ, पुटकुळ्या डागाची संभाव्यता. तंटे न्यायालयात जातील. पराक्रम कराल. संतती सौख्य बरे असेल. विद्याभ्यास बरा राहील.

कर्क

नसते आळ येवून बदनामी संभवते. जोडीदार वरचढ होईल. व्यावसायिक अडचणी सुटतील. नोकरीत दगदग वाढेल. मानसिक शांती लाभेल.

सिंह

मातुल (मामाच्या) कुटुंबातून सलोख्याचे लाभ प्राप्त होतील. शत्रुंवर वरचढ व्हाल. राजकारणात दोलायमान स्थिती उद्भवण्याची शक्यता. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल.

कन्या

मुलांचे हट्टनाकी नऊ आणतील. अचानक धनलाभ संभव. लॉटरीत लाभ संभवतो. वैवाहिक संबंध बिघडण्याची शक्यता दिसते. व्यवसाय मंदावेल.

तुळ

कौटुंबिक जबाबदारी येईल व पारही पडेल. वाहनयोग साधारणतः बरा असेल. पाळीव प्राण्यांच्या समस्या उद्भवतील. हृदयविषयक काळजी घ्या.

वृश्चिक

पराक्रम साधेल. विवाह जुळताना नाटकी व्यवहार होऊन रुसवे होण्याची शक्यता. रागावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रसुती अडली तरी सुलभ होऊ शकेल. साडेसातीचे परिणाम जाणवतील.

धनू

मानहानी संभवते. नोकरीत डिमोशनची चिंता असेल. उष्णतेचे त्रास (दात, दाढ, डोके. हाडे यांची दुखी) संभवतात. नवी मैत्री होईल. धनलाभ संभव.

मकर

मान सन्मान किंचित वाढेल. आरोग्य सुधारेल. स्त्रियांचे सौंदर्य खुलेल. विवाह जमण्यात अडचण उद्भवू शकते. निर्णयात चुका होतील.

कुंभ

त्वचा व हाडे यासंबंधीत तक्रारी उद्भवतील. सुचक स्वप्ने पडून प्रचितीस येतील. सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न काहीसा सफल होईल. प्रसुती दरम्यान छोटी मोठी शस्त्रक्रिया संभवते.

मीन

आरोग्याचा लाभ असेल. स्वकियांनी परकेपणा राहील. अपेक्षाभंगाच्या घटना संभवतात. दूरच्या किंवा परदेश दौर्‍याची शक्यता आहे. आजार सरड्यासारखे रंग बदलतील. मन चंचल राहील.