समतोल आहाराचे महत्त्व

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑक्टोबर २०११

समतोल आहाराचे महत्त्व | Samatol Aaharache Mahatva - Page 3

‘अ’ जीवनसत्त्वाप्रमाणेच ‘ब’ , ‘क’, ‘ड’ अशा इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे निरनिराळे विकार जडतात. त्याची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे.

जीवनसत्त्वकमतरतेमुळे होणारे विकारउपाययोजना
रातांधळेपणाआहारात पालेभाज्या, गाजर, पपई आणि दूध यांचा समावेश
जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणेआहारात डाळी, पालेभाज्या, दुध यांचा समावेश
हिरड्यांतून रक्त जाणेआहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश
पायाची हाडे वाकणे, पाठीला बाक येणेकोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे.

भारतीय आहार
आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले जातात. दक्षिणेकडे इडली, डोशासारखे पदार्थ लोकांना आवडतात. महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण भात प्रचलित आहेत. उत्तरेकडे आलू पराठा, छोले भटोरे सर्वांच्या आवडीचे पदार्थ आहेत.

अन्नपदार्थ तयार करण्याच्या आपल्याकडील पद्धती पुर्वापार चालत आलेल्या आहेत. पुर्वापार म्हणजे वर्षानुवर्षे. त्यापैकी काही पद्धतीमुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता वाढते.

हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आणुन केलेल्या उसळी आपण खातो. मोड येताना धान्यांमधील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते. तांदुळ आणि उडीद डाळीचा भरडा आंबवून इडली, डोसा, आंबोळी असे पदार्थ तयार केले जातात. आंबवण्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्त्वात वाढ होते, त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते.

याउलट अन्नपदार्थ खुप वेळ शिजत ठेवणे, शिजलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे, अशामुळे पदार्थाची पौष्टिकता कमी होते. शिजणाऱ्या पदार्थातून पाणी काढले असता या पाण्यात विरघळलेले उपयुक्त घटक पाण्यांबरोबर निघून जातात. अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्यांतील काही उपयुक्त घटक नाश पावतात.