Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मासिक पाळी आणि तक्रारी

लेखन डॉ. पी. के. देवी | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०११

मासिक पाळी आणि तक्रारी | Masik Pali Ani Takrari

पाळी येणं हे फक्त मनुष्य प्राणी व प्रायमेट या जातीतच आढळतं सामान्यपणे स्त्रियांच्यात पाळी २८ ते ३० दिवसांनी येते, त्यावेली गर्भाशयाच्या आतील आवरण, रक्त व काही प्रमाणात लाळेसारखा पदार्थ बाहेर पडतो. शरीरातील अशूद्ध द्र्व्य बाहेर टाकण्यासाठी (शरीर स्वच्छ करण्यासाठी) पाळी येते अशी दंतकथा व समज आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांना पाळीमध्ये अस्वच्छ समजलं जातं, म्हणून त्यांना त्या दिवसात नेहमीचं घरकाम, स्वयंपाक किंवा पूजा करण्यापासून दूर ठेवण्यात येतं, तर बऱ्याच ठिकाणी पाळी आलेल्या स्त्रीला वेगळ्या खोलीत ठेवले जातं किंवा वेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. पाळीच्या पाचव्या दिवशी अंघोळी नंतर कपडे बदलल्यावर ती स्वच्छ झाल्याचं समजूत तिला नेहमीचम जर घरकाम करायला परवानगी मिळते.

नैसर्गिक पाळी वास्तवता:
सामान्यपणे १३ ते १४ वर्षांच्या दरम्यान मुलीच्याच पाळीची सुरुवात होते. पाळी जाण्याचा काळ सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ वर्षाच्या आसपास धरला जातो. पाळीच्या वेळी ३ ते ७ दिवसपर्यंत अंगावर जाणं नैसर्गिक मानावं. प्रत्येक पाळीत ६० ते १०० मि.ली. पर्यंत (२ ते ४ औंसापर्यंत) रक्त अंगावर जातं. रोजचे, नेहमीचे व्यवहार पाळीत थांबवण्याचे काहीच कारण नाही. परंतु कष्टाचं काम किंवा दमेपर्यंत काम किंवा व्यायाम मात्र टाळावा. ही सूचना विशेषतः फक्त पाळीत अंगावर जास्त जाणाऱ्यांच्या स्त्रियांसाठी आहे. वरील वर्णनात कोणताही बदल आढळल्यास डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. शारीरिक किंवा मानसिक ताण, मलेरिया, टॉयफाईडसारख्या रोगानंतर किंवा वातावरणातील बदलानंतर पाळीतील दिवसात किंवा अंगावर जाण्याच्या प्रमाणात बदल घडू शकतो परंतु हा ब्दल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो व २ ते ३ महिन्यानंतर परत नीट वेळी पाळी सुरू होते.

पाळीतील काही विकृती किंवा बदल

Download MarathiMati.com's New Android App from Google Play