Loading ...
/* Dont copy */

केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य)

केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य) - स्त्रीसौंदर्यात केसांचे महत्त्व आणि त्याची निगा कशी राखावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य)

डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे


केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य) - केसांची विविध आणि कलापूर्ण रचना स्त्रिया अनादिकालापासून करीत आल्या आहेत. अजंठा, वेरूळ येथील पुराण शिल्प यांचे बोलकं उदाहरण आहे.

Article for health and beauty care of hair.



दशकांपूर्वी आपल्याकडे केशवपनाची चाल होती. स्त्री विधवा झाली की, तिचं केशवपन करण्यात येई. उद्देश असा की, विधवा कुरुप दिसावी. यावरून स्त्रीसौंदर्यात केसांना किती महत्त्व आहे हे कळून येतं. केसांशिवाय स्त्री ही कल्पनाच असह्य होते. यासाठी केसांची निगा राखणं अगत्याचं आहे.

मानव हा फॅशनप्रिय प्राणी आहे. त्यातल्या त्यात स्त्रियांचा फॅशन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांची विविध आणि कलापूर्ण रचना स्त्रिया अनादिकालापासून करीत आल्या आहेत. अजंठा, वेरूळ येथील पुराण शिल्प यांचे बोलकं उदाहरण आहे. नितंबापर्यंत रुळणारे काळेभोर केस आपल्याला आकर्षित करतात, तसेच मानेपर्यंत रुळणारे सोनेरी केस, गोरांगीचे सौंदर्य खुलवितात. डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. प्रत्येक स्त्री, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तरुणी असो वा प्रौढा असो ती आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या केसांची यथायोग्य निगा राखते.

केस म्हणजे काय?


वैद्यकीय दृष्ट्या केस आपल्या त्वचेचाच एक भाग आहे. केस आणि नखे केराटीन नावाच्या पाण्यात न विरघळणाऱ्या प्रथिनापासून तयार होतात. प्रत्येक केसाचे मूळ आंतरात्वचेमध्ये रुजलेले असते. फक्त केसांचे मूळ सजीव असते व बाकी भाग निर्जीव असतो. यामुळेच केस कापले तरी दुखत नाहीत आणि रक्तही येत नाही. केसांच्या मुळापासून पेशी वरवर येतात आणि या पेशीपासून केस तयार होतात. आपल्या शरीरावरील केसांचे काही प्रकार आहेत. नवजात अर्भकाच्या अंगावर दिसणारे केस कालांतराने गळून पडतात. हात पाय, ओठ वगैरे भाग वगळता आपल्या शरीरावर मऊ मुलायम फिकट सोनेरी अशी लव असते. डोक्यावर मात्र गडद रंगाचे जाड आणि राठ केस असतात. केस गळून पडताना, विशेषतः टक्कल पडण्याच्या वेळी आपल्या डोक्यावरील केस मऊ आणि बारीक होतात आणि सरतेशेवटी गळून पडत असतात. किशोरावस्थेतून यौवनात विशिष्ट जागेवरील लव राठ जाड व काळसर दिसू लागते.

वरून ढोबळमानानं पाहिल्यास डोक्यावरचे केस सारखेच वाटतात. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रानं पाहिल्यास केसामध्ये अनेक फरक दिसतात. चपटे केस, बांबूसारखे वाटाणारे, आडवा किंवा उभा छेद गेलेले केस वगैरे. बहुधा केसाच्या एका मुळांपासून एकच केस बाहेर येतो. कधी कधी मात्र एकाच मुळातून दोन किंवा अधिक केस उगवलेले दिसतात.

केसांची निगा


काळाभोर लांबसडक केशसंभार सर्वांनाच आवडतो. परंतु केस जितके लांब असतील तितकेच ते जीर्ण झालेले असतात हे ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. केस जितके लांब तितकीच त्यांची निगा राखणं कठीण काम असतं. नाहीतर केसांचा गुंता होऊन केस तुटू लागतात किंवा केस एकत्र घट्ट चिकटून त्यांच्या जटा होऊ लागतात. केस व दाढी न कापणारे व त्यांची देखभाल न करणारे साधू यांच्या केसांच्या जटा झालेल्या आपण पाहतोच.

केस आणि आहार


ज्यांचे शरीर सुदृढ आणि निकोप असते त्यांचे केस तजेलदार असतात. निकोप शरीराकरिता समतोल आहार घ्यावा लागतो. प्रथिनं योग्य प्रमाणात न मिळाल्यास केसांचा तजेलदारपणा आणि रंग कमी होऊन ते गळून पडतात. उपासमारीनं देखील असं होऊ शकतं. यथायोग्य प्रमाणात सर्व जीवनसत्त्वं आपल्याला आवश्यक असतात. केसांना देखील त्यांची गरज भासते. त्यातल्यात्यात ए, ई आणि बी-५ या जीवनसत्त्वांचा आणि केसांचा घनिष्ट संबंध आहे.

डोक्यावरील केसांची वाढ व्हावी, ते तजेलदार आणि भरघोस व्हावेत याकरिता बाजारात विविध प्रकारची केशवर्धक तेल आणि टॉनिक्स उपलब्ध आहेत. आपल्या मालाचा खप वाढावा याकरिता या कंपन्या आकर्षक जाहिराती देत असतात. वानगीदाखल एकच उदाहरण देतो. “आमचं केशवर्धक तेल चुकून टॉवेलवर पडलं आणि टॉवेलचं कांबळं झालं!” सर्वसामान्य जनता अशा जाहिरातींना बळी पडते. शास्त्रीयदृष्ट्या असं कोणतंही केशवर्धक तेल अस्तित्वात नाही. कुठचंही तेल बोटांवर घेऊन डोक्यावरील त्वचेला हळूवार मालिश केल्यानं केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह थोडासा वाढतो त्यामुळे कदाचित केस सशक्त होत असतील आणि त्यांची वाढ लवकर होत असेल, हा एक अंदाज आहे.

केसातील कोंडा


प्रत्येकाच्या डोक्यात कमी - अधिक प्रमाणात कोंडा होत असतो हे नैसर्गिक आहे, विकार नाही. थोड्या प्रमाणात होणारा कोंडा डोके नियमित धुतल्यानं निघून जातो. त्यावर औषधोपचार करण्याची गरज नसते. काही स्त्रियांना कोंड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. अशा स्त्रियांनी डोके आठवड्यातून किमान दोन वेळेला धुवावे. डोक्यावर तेल लावू नये. कोंडा अधिक वाढल्यास त्यापासून डोक्यावर खवडा होऊन त्यामुळे केस गळू लागतात. डोके धूण्याकरिता रिठा, शिकेकाई आणि शॅम्पू यांचा नेहमी वापर करतात. सेलीनियम सल्फाइडमुक्त शॅम्पू हा कोंडा कमी करण्याचा उत्तम मार्ग होय. प्रथिन शॅम्पू किंवा एगशॅम्पू या महागड्या शॅम्पूपेक्षा साधा शॅम्पू किंवा रिठा आणि शिकेकाई सर्व सामान्य जनतेला तितकीच उपयोगी पडतात. कोंडा वरचेवर होत असतो. त्यामुळे डोके वारंवार धुवावे लागते. कोंडा होण्याचं प्रमाण वयोमानाप्रमाणं कमी होत जातं. डोके वेळोवेळी धुतल्यानंतर देखील कोंडा काही ठिकाणी डोक्यावर चिकटून असतो. अशावेळेला केस कापून बारीक करणे हितावह असते. चिकटून बसलेला कोंडा विरघळून टाकण्याकरिता त्वचारोग तज्ज्ञ काही विशिष्ट औषधं देत असतात.

आपल्या डोक्यावरील अगणित केस एका ठराविक चक्रात फिरत असतात. वाढणारे केस, स्थितप्रज्ञ केस आणि गळून पडणारे केस असे हे चक्र असते आणि प्रत्येक केस या फेरीतून जात असतो. डोक्यांवरील ९० टक्के केस रोज ०.३५ मिमी या वेगानं वाढत असतात. तर १० टक्के केस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये असतात. एक टक्का किंबहुना त्याहूनही कमी केस गळण्याच्या मार्गी दिसून येतात. शास्त्रीय पाहणीमध्ये असं आढळून आलं आहे की, आपले केस ३ ते ७ वर्षांपर्यंत वाढत असतात. ३ महिने स्थितप्रज्ञ बनतात आणि २ आठवडे गळण्याच्या अवस्थेमध्ये दिसतात. केसाचं असं चक्र आहे आणि म्हणूनच आपले केस कापले नाहीत, तरीसुद्धा त्यांची लांबी नितंबापर्यंत क्वचितच पोहोचते. तसंच केसांच्या चक्रातील गळणारे केस रोज साधारणपणे २०-४० पर्यंत गळून पडतात. यानं विचलीत होण्याचं कारण नाही. हे नैसर्गिक आहे आणि गळलेले हे केस परत उगवतात.

स्त्रियांच्या मासिक पाळीत नेहमीपेक्षा जास्त केस गळतात. प्रसूती नंतर किंवा दीर्घ मुदतीच्या तापानंतर साधारणपणे ३-६ महिन्यांनी अचानक खूप प्रमाणात केस गळून पडतात. याचं कारण वाढण्याच्या स्थितीत असलेले बरेचसे केस आपला मार्ग बदलून गळण्याच्या मार्गाला लागतात. परंतु या केसांची मुळे शाबुत राहिल्यास हे केस नंतर दिसू लागतात हे सुद्धा नैसर्गिक आहे.

केसांचे इतर विकार


डोक्यावर होणारा खबडा, बुरशीचे रोग, पुवाने भरलेले खांडके यामुळे केस गळतात आणि टक्कल दिसू लागते. शरीरामध्ये फोफावत असलेल्या कर्करोगासारख्या रोगांमुळे डोक्यावरील केस कमी होऊ लागतात. या सर्व रोगांवर उचित उपाय केल्यानंतर हे रोग बरे होतात आणि नंतर केस पुन्हा उगवू लागतात. पुंजक्या पुंजक्याने केस गळण्याचा आणखी एक प्रकार आहे. ठराविक भागातील सर्वच केस गेल्याने तिथं टक्कल पडतं. शरीरामध्ये काही बिघाड झाल्यास असा प्रकार होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा असा काही बिघाड दिसून येत नाही. तरीसुद्धा केस गळून पडतात. योग्य उपचारानंतर पडलेलं टक्कल केसांनी भरून येते. डोक्यावरील कातडी अग्नीमुळे भाजल्यानंतर, क्ष किरणे अमर्यादित दिल्याने किंवा डोक्यावर होणाऱ्या गंभीर आजारानंतर देखील केस गळून पडतात. या प्रकारामध्ये कातडीबरोबरच केसांचे समूळ उच्चाटन होतं आणि केस परत येऊ शकत नाहीत. अशा प्रकारामुळे पडलेले टक्कल केसांचा टोप वापरून किंवा केशारोपण (Hair Transplant) करून झाकता येतं.

स्त्रियांना नकोसे वाटणारे केस


डोक्यावरील केस कमी झाल्यास युवतीला जेवढी काळजी वाटते (नको असलेले केस काढण्याचे अनेक उपाय असतात आपल्याला सोयीस्कर आणि अपाय न होणारा उपाय प्रत्येकीने काळजीपूर्वक निवडून मगच नको असलेले केस काढावेत) त्यापेक्षा कितीतरी पट अधिक काळजी नको त्या ठिकाणी केस दिसू लागल्यास वाटू लागते. ही ठिकाण म्हणजे वरचा ओठ, हनुवटी आणि छाती या ठिकाणी जी लव असते तिचा रंग गडद होतो, ती राठ होते आणि लांब होते. यामुळे स्त्रिया ‘पुरुषी’ दिसू लागतात. असे केस दिसू लागल्यानंतर स्त्रियांना समाजात वावरणं कठीण होतं, त्या एकलकोंड्या बनतात. तर काही स्त्रिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा स्त्रियांचं प्रदर्शन करून धंदेवाईक लोक कमाई करतात. सामान्य जनतेला त्याचं कुतूहल वाटतं. शास्त्रज्ञांना याची जिज्ञासा आहे. एक आव्हान आहे.

३० टक्के स्त्रियांमध्ये असे नकोसे वाटणारे केस, कमी अधिक प्रमाणात आढळतात. हे वाचून काहींना दिलासा वाटेल, तर काही जणांना नवाल वाटेल. परंतु हे सत्य आहे. नकोसे वाढणारे केस कधी कधी एकाच ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ हनुवटीवरील केस, एखाद्याच ठिकाणी उगवणारे केस, मार लागल्याने वारंवार होणाऱ्या घर्षणामुळं, रसायनं, तसेच अंतःस्त्राव (हार्मोन्स) यामुळे उगवू शकतात. मज्जासंस्थाचे रोग अंतःस्त्राव पिंडींचे  (Endocrine glands) आणि इतर काही रोग यामुळे देईल ओठ, अनुवटी, छाती, हात आणि पाय येथे पुरुषाप्रमाणे स्त्रियांचे केस दिसू लागतात. उपासमारीनं आणि कॉर्टिझोनसारख्या काही औषधांनी देखील असे केस दिसू लागतात. स्त्रियांच्या शरीरात ठराविक वेळेला स्थित्यंतर होत असतात. मासिक स्त्राव सुरू होतांना, गर्भारपणी, तसंच मासिकपाळी बंद होताना असे बदल होत असतात. अंतःस्त्रावामुळे होणारे बदल, यामुळंच अशी स्थत्यंतरे होत असतात. अशावेळी देखील स्त्रियांना नकोसे वाटणारे केस ओठ, हनुवटी, छाती इत्यादी भागावर स्पष्ट दिसू लागतात. सुदैवानं अंतःस्त्रावाची समतोलता काही काळानं नैसर्गिकरीत्या स्थिरावते व नकोसे वाटणारे केस अस्पष्ट होतात.

नको असलेले केसांवरचे उपाय


नकोसे वाटणारे केस दिसू लागल्यास काही स्त्रिया भयंकर व्यथित होतात आणि त्यांच्या डोक्यात नको ते विचार घोळू लागतात. काही अविचारी करण्यापूर्वी अशा स्त्रियांनी त्वचारोग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा. ते योग्य मार्गदर्शन करू शकतील. नकोसे वाटणारे केस नष्ट करण्याचे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.

(१) कात्रीने किंवा रेझरने केस कापणं
हा उपाय सोपा आहे. पण यामुळे केस राठ होण्याची शक्यता असते. केस एकदा कापल्यानंतर हा प्रकार पुनः पुन्हा करावा लागतो. बऱ्याच वृद्धा हा सोपा मार्ग अवलंबितात.

(२) रसायने वापरून केस नष्ट करणे
डिपि लेटींग किंवा एपिलेटींग क्रीम्स किंवा साबण बाजारात उपलब्ध आहेत. या रसायनांनी केस विरघळतात. परंतु मुळाला धक्का पोहोचत नाही. केस पुन्हा उगवतो व हा उपायही पुनः पुन्हा करावा लागतो. काही जणींना या रसायनांपासून अ‍ॅलर्जी होते आणि त्यामुळे त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते.

(३) केस मुळासकट उपटणे
बारीक चिमट्यानं, ट्विझरने (Tweezer) नको असलेले केस उपटता येतात. अनुभवी लोक या प्रकारानं केस मुळासकट काढू शकतात. फक्त केस उपटल्यास मुळापासून केस पुन्हा उगवतो आणि केस परत उपटावा लागतो. भुवयांचे केस काढण्याकरिता किंवा भुवयांना योग्य आकार देण्याकरीता थ्रेडिंग करतात. दोऱ्याला पीळ देऊन त्यामध्ये भुवयांचे केस पकडून उपटले जातात. हातपायावरील केस काढण्याचा वॅक्सींग हा एक प्रकार आहे. केसाळ भागावर मेणासारखं द्रव्य (हे बाजारात उपलब्ध आहे.) फासलं जातं. तलम कपड्यानं हा भाग झाकतात. काही वेळानंतर लावलेलं द्रव्य सुकतं आणि केस व कपड्याला चिकटतं. अशावेळी हा तलम कपडा केस उगवण्याच्या विरुद्ध दिशेनं पटकन खेचून काढतात. क्षणार्धात केस उपटले जातात.

(४) ब्लिचिंग
हायड्रोजन पेरॉक्सॉइड किंवा इतर रासायनिक द्रव्ये नको असलेल्या केसांना लावल्याने केसांचा गडद रंग फिका पडतो, व कातडीशी मिळता जुळता होतो आणि त्यामुळे हे केस चटकन उटून दिसत नाहीत.

(५) इलेक्ट्रोलाइसिस
केसांच्या मुलांपर्यंत विद्युत प्रवाह सोडून केस कायमचे नष्ट करण्याचा एक चांगला उपाय आहे. परंतु या उपायानंतर काही स्त्रियांच्या केस काढलेल्या जागेवर खडबडीत पुटकुळ्या दिसतात आणि भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची पाळी येते.

नको असलेले केस नष्ट करण्याचे काही उपाय हे असे आहेत. सर्वांनाच हे उपाय लागू पडतील असे नव्हे. ज्यानं त्यानं आपल्याला सोईस्कर असा प्रकार निवडावा हे उत्तम.

केसांचे सौंदर्य


केसांच्या सौंदर्यांच्या व्याख्या स्थळी काळी बदलतात. भरपूर लांबसडक काळेभोर केस आपण सौंदर्याचे लक्षण समजतो. इंग्लिश लोकांना सोनेरी केसांचे आकर्षण असतं. युरोपियन स्त्री आपले सरळसोट केस चिमटे लावून कुरळे करून घेते. या उलट निग्रो स्त्रियांना त्यांचे कुरळे केस नको होतात आणि त्या आपले कुरळे केस सरळ करवून घेतात. केस लांब असले तर उत्तमच, नपेक्षा केसांचा विग लावून स्त्रिया आकर्षक केशभूषा करीत असतात. आपण आपली वेशभूषा रोज बदलतो त्याचप्रमाणे अमेरिकन युवती रोज निरनिराळ्या रंगाच्या आणि विविध आकाराच्या केसांचा टोप वापरतात. आपल्याकडील सिनेतारका असे टोप वापरताना दिसतात.

प्रत्येक स्त्रीला आपण चिरतरुण दिसावं असं वाटतं. केस पांढरे होणे हे वार्धक्याचे लक्षण होय. बऱ्याचवेळा ऐन तारुण्यात देखील केस पांढरे होऊ लागतात. अशावेळी कलप लावून केस काळे करता येतात. कलप निरनिराळ्या प्रकारचे आणि रंगाचे असतात. कलप पावडर, द्रवरूप किंवा शॅम्पू या प्रकारांनी बाजारात मिळतात. आपणास योग्य असा कलप गरजूंनी निवडावा. कलप लावल्यानं काही लोकांना अ‍ॅलर्जी होते. तसंच कातडीला अपाय होण्याचा संभव असतो. केसांना मेंदी लावून पिंगट करणे हासुद्धा कलपचाच एक प्रकार होय. केसांचं हे माहात्म्य संपवण्यापूर्वी हे सुचित करावसं वाटतं की, मानवाच्या शरीराला केस नकोशी वाटणारी वस्तू आहे. मानवाचा पूर्वज गोरिला याच्या सर्वांगावर केस आहेत. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसे त्याच्या अंगावरील केस गळून पडले आणि या उत्क्रांतीची झळ डोक्याच्या केसापर्यंत पोहोचली आहे. शास्त्रंज्ञांच्या मते भावी मानवाच्या केवळ शरीरावरीलच नव्हेत, तर डोक्यावरील केसदेखील संपूर्ण गेलेले असतील!

- डॉ. चंद्रकांत जगावकर

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1345,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,36,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1086,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,68,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1129,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,54,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य)
केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य)
केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य) - स्त्रीसौंदर्यात केसांचे महत्त्व आणि त्याची निगा कशी राखावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQpf65LqM5qM-PPTTL1LvMaFEfauLt0wiyMwBorZ37DVrvb0VYzpAe4ehXQXnXYG0NoSD90anV24yXzDvgPZ31nm83u7RA7sXPJc2fliS3eqr7IUMM7TfaKYnw-q1fH8-IqjA6cEfj274UaZy89sCZW1rEbCJlYU42buA5xDOhzLeqwEOhm3DJpwtrbw/s1600-rw/health-and-beauty-care-of-hair.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQpf65LqM5qM-PPTTL1LvMaFEfauLt0wiyMwBorZ37DVrvb0VYzpAe4ehXQXnXYG0NoSD90anV24yXzDvgPZ31nm83u7RA7sXPJc2fliS3eqr7IUMM7TfaKYnw-q1fH8-IqjA6cEfj274UaZy89sCZW1rEbCJlYU42buA5xDOhzLeqwEOhm3DJpwtrbw/s72-c-rw/health-and-beauty-care-of-hair.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/07/health-and-beauty-care-of-hair.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/07/health-and-beauty-care-of-hair.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची