Download MarathiMati.com's New Android App from Google Play

आई बाळाचे संगोपन

लेखन डॉ. एस्‌. एम्‌. मर्चंट | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१०

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan - Page 7

मुलाच्या विकासासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत?

  • मुलांना पुरेसा पौष्टिक आहार द्या. पण त्यांना अन्न खाण्यासाठी दुराग्रह करू नका. बळजबरी केली तर अन्नाचा परिणाम होणार नाही.
  • रोगप्रतिबंधक लस मुलांना टोचून घेण्याची खबदारी घ्या.
  • मुलांना मार्गदर्शन करा. शिकवत रहा. त्यांना प्रेम, माया द्या. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढा. त्यांना उगीचच सतत आपल्या संरक्षणाखाली ठेवू नका. त्यांना मोकळेपणानं खेळू बागडू द्या.
  • तीन ते पाच वर्षांपर्यंत दुसरं मूल होऊ देऊ नका. आणि दुस्रऱ्या मुलाच्या आगमनाच्यावेळी पहिल्याच्या मनाची तयारी करून ठेवा.
  • मुलाला शाळेची गोडी लावा.
  • अपघात आणि विषबाधा होऊ न देण्यासाठी काळजी घ्या.
  • सुखी कुटुंबासाथी आदर्श माता हवीच. आई ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. कुटुंबाचं स्वास्थ्य, सुख, आरोग्य आईबरोबरच अवलंबून असतं. आजचं मूल उद्याची आई किंवा बाप होणारं असतं. त्यासाठी, आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी योग्य ती काळजी घ्या.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play