पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

आई बाळाचे संगोपन

लेखन डॉ. एस्‌. एम्‌. मर्चंट | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१०

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan - Page 5

बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा
सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असं नाही बाळाला प्रेम, वात्सल्यही हवं असतं. आईवडीलांचं प्रेम त्याला मिळणं आवश्यक असतं. आपण एका कोवळ्या जिवाला वाढवितो आहोत. या दृष्टीनं हळुवार मनानं, हिडीसफिडीस न करता, न कुरकुरता, प्रेमानं त्या जिवाची काळजी घ्यायला हवी. दाया, नर्सेस यांच्यापेक्षा आईची माया त्याला मिळायला हवी.वयाची दोन ते पाच वर्षांचा काळ बाळाच्या वाढीच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक असा असतो. आणि या वयोगटाच्या मुलांचं संगोपन जर नीट काळजीपूर्वक झालं नाही, तर पुढं पालकांच्या दृष्टीनं त्यांचं मूल म्हणजे एक समस्याच होऊन बसते. म्हणूनच या वयोगटातल्या मुलांकडे पालकांनी विशेषतः आईनं काही बाबतीत अत्यंत काळजी घ्यायला हवी ( बाळाचं आगमन स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्याच्या स्वागताची सर्वांगीण तयारी स्त्रीनं करावी.) ( अंगावरचं दून निर्जंतुक असतं. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात अंगावरच्या दुधामुळं बाळाला संसर्गापासून दूर ठेवता येतं. ) या कालखंडात खालील महत्त्वाच्या गोष्टी बाळाच्या शरीरात घडत असतात.

  • वाढीचा वेग वाढतो आणि मंदावतो.
  • भाषा कळू लागते. बोलणं आणि समजणं हे या काळातच घडत असतं.
  • बुद्धीचा विकास होतो.
  • वागण्याच्या पद्धतीचा म्हणजे वर्तनाचा विकास होतो.
  • मज्जासंस्था स्नायू यांच्या परस्परसंबंधाचा विकास होतो.
  • मल आणि मूत्रावर नियंत्रण करता येऊ लागते.
Book Home in Konkan