आई बाळाचे संगोपन

लेखन डॉ. एस्‌. एम्‌. मर्चंट | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१०

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan - Page 4

संसर्गापासून संरक्षण
आपले घर आणि बाळ यांची स्वच्छता ठेवणं ही गोष्ट स्त्रियांनी कटाक्षानं लक्षात ठेवली पाहिजे. यामुळं संसर्गजन्य रोगांपासून बाळाचं रक्षण होईल. सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींपासून बाळाला दूर ठेवावं उकळलेलं पाणी, शिजवलेलं अन्न आणि धुतलेली फळं भाजीपाला यांचाच आहारात वापर करावा. देवी, डांग्या खोकला, घटसर्प, धर्नुवात पोलिओ, टायफाइद अशासारख्या रोगांच्या लसी बाळाला वेळेवर देणं अत्यावश्यक आहे. संसर्गाची पुसटशी चिन्हं जरी बाळाला दिसू लागली तरी लगेच उपचार करून घेणंही आवश्यक आहे.