पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

आई बाळाचे संगोपन

लेखन डॉ. एस्‌. एम्‌. मर्चंट | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१०

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan - Page 3

बाळाचा मानसिक आणि भावनिक विकास
आईवडीलांनी आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त राह्यला हवं. त्याला फिरायला नेणं, त्याच्याशी बोलणं, हसणं, खेळणं, हलक्या हातानं पाठ थोपटणं या गोष्टी तर आवश्यक असतातच, शिवाय त्यांची दृष्टी आणि श्रवणशक्ती यांचा विकास होण्यासाठी रंगीबेरंगी, आवाज करणारी खेळणी त्यांच्यासमोर ठेवावीत. एखादी बाहुली जेव्हा आवाज करते, आगगाडी शिट्टी देते आणि धवू लागते तेव्हा मूल हसू लागतं. त्यावेळही आपणही हसून त्याच्या हसण्याला उत्तेजन द्यायला हवं. बाळाच्य प्रत्येक हालचालीला, हावभावांना आपणच उत्तेजन द्यायला हवं. हे काम इतर दुसऱ्या कुणाचं संभाळणाऱ्या मुलीचं, दाईचं नाही. असं उत्तेजन देत गेल्यानं मुलाच्या मानसिक आणि भावनिक विकासाला महत्त्वाची मदत होत असते. बुद्धिमत्ता ही केवळ मेन्दू इंवा जेन्सवर अवलंबून नसते तर परिस्थिती आणि वातावरणातून मिळणाऱ्या उत्तेजनावरही अवलंबून असते.

Book Home in Konkan