पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

आई बाळाचे संगोपन

लेखन डॉ. एस्‌. एम्‌. मर्चंट | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१०

आई बाळाचे संगोपन | Aai Balache Sangopan - Page 2

योग्य आणि पुरेसा आहार
अंगावरचं दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. बाळासाठी हे निसर्गानं पुरविलेलं दूध असतं. बाळाला अंगावरचं दूध पाजल्यामुळं बरेच फायदे होतात. त्याला विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येतं. प्रामुख्यानं जुलाब हगवणीसारख्या आजारापासून त्याचप्रमाणं ‘क’ जीवनसत्त्वही अंगावरच्या दूधातून मिळत असल्यामुळं बाळाला त्याची कमरतरता पडत नाही. ते निर्जंतुक असतं, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. याचबरोबर अंगावर दूध पाजल्यानं बाळ आणि आई यांच्यात एक अतूट भावनिक नातं निर्माण होत असतं. जेव्हा दूध आईला कमी येत असेल तेव्हा बाहेरचं सर्वोकृष्ट, सकस दूध बाळाला देत जावं, बाळ ६ ते ८ आठवड्याचं झालं की, फळांचे रस, सूप द्यायला सुरुवात करावी. ते ४ महिन्याचं झालं की खिरीसारखे पदार्थ आणि वर्षापासून नेहमीचं अन्न द्यायला सुरवात करावी. परंतु देताना आईनं अतिआग्रह करून खायला घालू नये. पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी बाळावर बळजबरी करणं धोक्याचं असतं. मुलाला भूक केव्हा केव्हा लागते हे त्याच्या मागणीवरून ठरवून, दिवसातल्या ठराविक वेळीच त्याला भरवणं केव्हाही चांगलेच. पहिल्या वर्षात दिल्या जाणाऱ्या अन्नात जीवनसत्त्व - खनिजं यांची कमतरता पडू न देण्याची काळजी घ्यावी.

Book Home in Konkan