आयुर्वेदिक औषधे

आरोग्य | Health

आयुर्वेदिक औषधे - Information about Ayurvedic Medicines[Ayurveda,आयुर्वेद] in Marathi Language.

आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी (Dhanvantari) हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

औषधी डाळींब | Medicinal Pomegranate

औषधी डाळींब

आयुर्वेदिक औषधे

डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते.अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.

अधिक वाचा

मधाचे औषधी उपयोग | Medicinal Uses of Honey

मधाचे औषधी उपयोग

आयुर्वेदिक औषधे

मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

अधिक वाचा

विविध व्याधींवर पिंपळी | Medicinal Uses of Long Pepper

विविध व्याधींवर पिंपळी

आयुर्वेदिक औषधे

पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होते.

अधिक वाचा

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने | Beauty Tips from Kitchen

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

आयुर्वेदिक औषधे

पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.

अधिक वाचा