मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi - Page 6

शासकीय अधिकार्‍यांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव सुनील लिमये यांनी कारवीच्या अधिवासावर लागवड करण्याची पद्धत त्यांनी बंद केली असल्याचं सांगितलं. वर्गीस यांना कारवीचं बहरणं आणि पर्यावरण बदल यांच्यात असलेल्या संबंधांचा अजून फारसा अभ्यास झालेला नसल्याची खंत आहे. त्यांनी बर्‍याचदा स्थानिक लोकांच्या तोंडून गेल्या काही वर्षात फुलोरा विरळ होत गेल्याची तक्रार ऎकली आहे.

कारवीच्या या मनमोहक फुलोर्‍याचा माणसांच्या मनावरही प्रभाव न पडला तरच नवल. कारवी महोत्सवाच्या आयोजक मंदाकिनी माथुर यांना ही कल्पना पाचगणीतील एक ज्येष्ठ आणि हाडाचे निसर्गप्रेमी स्व. विनायक दिक्षित यांना आदरांजली म्हणून सुचली. त्यांनीच माथुर यांना १६ वर्षापूर्वी पहिल्यांना कारवीचं फुलणं दाखवलं होतं. यावेळी महोत्सवाच्या माहितीपुस्तकेतील कारवीचं फुल आपल्या शाळेतील परिसरात फुललेलं पाहून आपल्याला कसा आश्चर्यकारकरित्या कारवीचा शोध लागला याबद्दल संजीवन शाळेतील जीवशास्त्रज्ञाच्या एका शिक्षिकेनंही उत्साहानं सांगितलं.

यावेळी मी जमिनीवर पडलेली कारवीची काही फुलं माझ्या वहीत जपून ठेवण्यासाठी उचलली खरी पण मग त्या ओलसर मातीला सुवासित करणारी ती फुलं मी परत तिथंच टाकून दिली आणि २०२४ मध्ये कारवीला पुन्हा भेटण्याची इच्छा आपल्या मनात जपून ठेवायचं ठरवलं.

The Indian Express च्या Eye या रविवारीय साप्ताहिकात २ ऑक्टोबर २०१६ रोजी इंग्रजीतून प्रथम प्रकाशित.
पियुष सक्सेरिया हे दिल्लीस्थित एक सल्लागार आणि संशोधक आहेत. Our Tigers Return - Children's Story Book - The Story of Panna Tiger Reserve (2009 - 2015) या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.