Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi - Page 5

परंतु या विलक्षण वनस्पतीचं भविष्यही एकंदरीत प्राणी आणि पर्यावरणाच्या भविष्यासारखंच संकटग्रस्त आहे. पाचगणी, मुंबईतील संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, चोरला घाट, गोवा, आंबोली आणी मुन्नार येथे कारवी पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी सायली पलांडे - दातार यांनी याविषयी बोलतांना खालील शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘पर्यावरण आणि त्याचे संवर्धन समजून घेण्याची ही अद्वितीय संधी फक्त फोटो काढण्याची संधी बनून राहणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.’

निलगिरीमध्ये अगदी ब्रिटीशांच्या काळापासून कुरुंजीच्या अधिवासांवर चहा, देवदार, वॉटल, निलगिरी इत्यादींची लागवड केली जात आहे तसेच धरणांसारखी ‘विकासकामेही’ तिचा अधिवास बळकावत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मर्यादित प्रसारामुळे कारवी अधिकच असुरक्षित बनली आहे. बेंगळूर येथील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एडव्हान्स स्टडीजच्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर समीरा अग्निहोत्री यांनी Ageratina adenophora सारख्या वेगाने पसरणार्‍या विदेशी वनस्पतींनीही बिलिगिरीरंगा पर्वतांमध्ये कुरुंजीच्या अधिवासावर ताबा मिळवला असल्याचे सांगितले.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play