Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi - Page 3

याच वर्षी या दोन कारवींच फुलून येणं जणू पुरेसं नव्हतं म्हणून दक्षिणेत आढळून येणारी आणि १२ वर्षांनी फुलणारी प्रसिद्ध निलकुरुंजीही यांच्या जोडीला मोहरुन आली आहे. तामिळनाडू आणि केरळ मध्ये पसरलेल्या निलगिरी पर्वतरांगांवर ती फुलली आहे. आपल्या निळसर पांढर्‍या फुलांनी संपूर्ण डोंगर व्यापून टाकणार्‍या या फुलांमुळेच या पर्वताला निलीगिरी हे नाव पडलं असं म्हणतात.

कारवी/कुरुंजीचं झाड आणि तिच्या बहरण्याचा हा अनुपम सोहळा तिथल्या मूळ जमातींच्या जीवनात मोत्यातील धाग्याप्रमाणे गुंफलेला आहे. मुन्नारचे मुथुवान आणि निलगिरीचे टोडा लिक कुरुंजीच्या फुलोर्‍याला मांगल्याचं प्रतिक मानतात. फुलं येऊन गेल्यानंतर पुन्हा बी अंकुरेपर्यंत वाळलेले झाड तोडणे स्थानिक रुढीनुसार अमंगल मानलं जात. मुथुवान लोक कुरुंजीच्या बहरण्यानं आपलं वय मोजतात आणि कुरुंजीला प्रेम आणि प्रणयाचं प्रतिक मानतात.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play