Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मेळावर आली कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

मेळावर आली कारवी | Melavar Aali Karvi - Page 2

कारवीच्या बीज प्रसाराची पद्धतही विलक्षणच आहे. वनस्पती शास्त्रज्ञ अपर्णा वाटवे यांनी ती समजावून सांगितली. कारवींच्या बियांचा प्रसार अद्रतास्फोटातून होतो. कारवीची वाळलेली फळे बराच काळ ओलसर वातावरणात राहिल्यास ती फुटून त्यातून बिया जोरात बाहेर फेकल्या जातात. या बिया आपल्या मूळ झाडापासून ५ मीटर दूर पर्यंत जाऊन पडतात आणि पावसाळ्यात उगवतात. हा घटनाक्रम Strobilanthes या वनस्पती प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. भारतात या प्रकारातल्या ५६ वनस्पती आढळून येतात.

याच वर्षी याप्रकारातील उत्तर पश्चिम घाटाच्या पठारांवर येणारी आणखी एक वनस्पती, टोपली कारवीही फुलली आहे. उलट्या ठेवलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून तिला मराठीत हे नाव पडलं. टोपली कारवीच्या बीजापासूण फुलं येण्यापर्यंतच्या कालक्रमाबद्दल तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. आंबोलीचे निसर्गप्रेमी महादेव भिसे साम्गतांना म्हणाले की, ‘स्थानिक लोक टोपली कारवीला अकरा म्हणतात कारण ११ हा तिला फुलोरा येण्याचा कालावधी दर्शवतो. हिलाच बकरा असंही म्हटलं जातं कारण तिचं झाड खाली डोकं घालून चरत असलेल्या बकरीसारखं दसतं.’

Download MarathiMati.com's New Android App from Google Play