पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

जागतिक तापमानवाढ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २०१०

जागतिक तापमानवाढ | Global warming

जागतिक तापमानवाढ - [Global warming] जागतिक तापमानवाढ पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.

जागतिक तापमानवाढीचा इतिहास
पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्यावेळेसची तापमानवाढ हे पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात अमूलाग्र बदल झाले होते.

जागतिक तापमानवाढीची सद्य स्थिती
सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. साचा:संदर्भ पाहिजे ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. या लेखात हरितवायू परिणाम म्हणजे काय व नेमकी कश्याने तापमान वाढते हे नमूद केलेच आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्नांनीच शक्य आहे आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे. हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिका, युरोप, चीन, जपान हे देश जवाबदार देश आहे. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व या देशाने अजूनही या क्योटो प्रोटोकॉल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे प्रयत्न करणार्‍या देशांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल या बाबतीत शंका आहेत.

Book Home in Konkan