गर्जा महाराष्ट्र | Garja Maharashtra

गर्जा महाराष्ट्र | Garja Maharashtra

Download Garja Maharashtra's official Wallpapers
Download Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi Wallpaper
Download Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi WallpaperDownload Garja Maharashtra Marathi Wallpaper
  • निर्मिती : Oneness Films
  • निर्माते : प्रतापसिंग शिंदे
  • दिग्दर्शन : निलेश कुंजीर
  • गीत-संगीत : शशी चव्हाण
  • गायक : मधूर शिंदे
  • कलाकार : राहुल कुलकर्णी, दिपक गोसावी, मधुरा मुंजल आणि विपुल साळुंखे
  • ऑनलाईन वेब पार्टनर : मराठीमाती डॉट कॉम

गर्जा महाराष्ट्र | Garja Maharashtraस्वातंत्र्य दिन असो गणतंत्र दिन असो वा महाराष्ट्र दिन आपल्यातले बरेच बहुदा आपण सुद्धा हा दिवस सुट्टीचा दिवस समजून घरी आराम करण्यात किंवा कुठेतरी फिरण्यात घालवतो. पण जर हाच दिवस आपण सत्कर्मी लावला तर?

महाराष्ट्रात अनाथांसाठी, वृद्धासाठी किंवा इतिहासाच्या खुणा जपण्यासाठी करण्यासाठी बर्‍याच सामाजिक संस्था आहेत ज्या या महाराष्ट्राचं आपण काहीतरी देनं लागतो म्हणून कार्यरत आहेत. आपण त्या ठिकाणी आर्थिक मदत करू नाही शकलो तरी अशा ठिकाणी जाऊन थोडासा वेळ नक्कीच देऊ शकतो.

"गर्जा महाराष्ट्र" या गाण्याचा जन्म सुद्धा केवळ याच भावनेने झाला आहे. तस पहायला गेलं असतं तर या गाण्यात विविध गोष्टीनी संपन्न असा महाराष्ट्र दाखवता आला असता ज्यामुळे लोकांना ते भावले सुद्धा असते परंतु तस न करता थोडासा वेगळा विचार आणि आपण सुद्धा या महाराष्ट्राचे काही देनं लागतो ही जाणीव लोकांना व्हावी यासाठी एक वेगळाच विषय हाताळण्याचा प्रयत्न oneness films च्या टीमने केला आहे.

त्यासाठी निर्माते प्रतापसिंग शिंदे यांचा खूप मोठा हातभार लागला आहे. या गाण्याने आर्थिक फायदा होणार नाही याची जाणीव असून सुद्धा त्यांनी केवळ आर्थिक मदत न करता गाण्याच्या चित्रीकरणावेळी सोबत राहून एक वेगळाच असा अनुभव घेतला.

या गाण्याचे चित्रीकरण सिंधुताई सकपाळ यांचे "ममता बाळ सदन" कुंभारवळण, मल्हारगड, सासवड तसेच बारामतीचे वृद्धाश्रम "बारामती ज्येष्ठ नागरिक निवास", तांदुळवाडी या ठिकाणी झाले.

गाण्याचे गीत तसेच संगीत शशी चव्हाण यांचे असून मधुर शिंदे यांनी हे गीत गायले आहे. गाण्यामध्ये राहुल कुलकर्णी (बालगंधर्व, अजिंठा, लक्ष्य फेम), दिपक गोसावी (एका पेक्षा एक, बुगी वुगी फेम), मधुरा मुंजल तसेच विपुल साळुंखे (विजयअसो, बालगंधर्व, कालाय तस्मे नम: फेम) हे कलाकार लाभले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन निलेश कुंजीर यांनी केले आहे.

विविध मराठी वाहिन्यांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणे पोहोचावे आणि लोकांमध्ये समाज कार्याची भावना निर्माण व्हावी हा एकमेव उद्धेश oneness filmsआणि त्याच्या सदस्यांचा आहे.

गाण्याचे online partner हर्षद खंदारे (marathimati.com) हे आहेत.

 

comments powered by Disqus
गर्जा महाराष्ट्र | Garja Maharashtra
marathimati.com |