राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे येथे उदाहरणार्थ नेमाडे सोबत कवी सौमित्र

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे येथे उदाहरणार्थ नेमाडे सोबत कवी सौमित्र - कार्यक्रम | Udaharnarth Nemade With Kishor Kadam at NFAI Pune - Event
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे येथे उदाहरणार्थ नेमाडे सोबत कवी सौमित्र

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे येथे उदाहरणार्थ नेमाडे सोबत कवी सौमित्र - मराठी साहित्य ज्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असा लेखक, कवी, सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ प्राप्त, ३७ वर्षे ‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहिणारा अवलिया, ‘देखणी’ कविता लिहणारा भन्नाट कवी, देशीवाद मांडून चर्चा घडवणारा, गावोगावी लेखकांची एक पिढी तयार करणारा समीक्षक, भाषाप्रभु ‘भालचंद्र नेमाडे’.

‘कोसला’ ने अवघ्या मराठी साहित्यात नवी वाट घडवली, ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्यु फिक्शन प्रकारातील चित्रपटातून ‘अक्षय इंडीकर’ ह्या तरुणाने भालचंद्र नेमाडेंच्या समग्र व्यक्तिमतचा वेध घेतला आहे.

रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे सकाळी ११ वाजता ‘किशोर कदम’ उर्फ ‘सौमित्र’ हे ‘भालचंद्र नेमाडे’ यांच्या कविता आणि ‘कोसला’ या कदंबरीतील ‘मनी’चं प्रकरण वाचणार आहेत आणि त्यांनतर ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा चित्रपट रसिकांना विनामूल्य पहायला मिळणार आहे.

उदाहरणार्थ नेमाडे

दिनांक: १८ मार्च २०१८
वेळ: सकाळी ११
स्थळ: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे