पैसो का पेड - १०४.२ माय एफ. एम रेडीओ रिएलीटी शो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जुलै २०१७

पैसो का पेड - १०४.२ माय एफ. एम रेडीओ रिएलीटी शो | Paiso Ka Ped - 104.2 My FM Radio Reality Show Nashik

एक ‘पैसो का पेड’ आणि २१ गुपिते मनात दडलेली...
भारतातील पहिला आणि सगळ्यात मोठा रेडीओ रिएलीटी शो ‘पैसो का पेड’

रेडीओच्या इतिहासातील पहिला आणि सगळ्यात मोठा रेडीओ रिएलीटी शो ‘पैसो का पेड’ ला आजपासून प्रारंभ होत आहे.

‘पैसो का पेड’ ला जो जितका जास्त वेळ धरून ठेवेल, तोच जिंकू शकेल तीन लाख रुपये. 104.2 माय एफ.एम आणि वैष्णवी इलेक्ट्रिकल्स यांच्या आय अनोख्या रिएलीटी शो मध्ये सहभागी होण्यासाठी हजारांहून अधिक स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यापैकी एक हजार स्पर्धक ऑडीशन साठी आले होते, या ऑडीशन मध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर तपासलं गेलं आणि त्यानंतर होणाऱ्या फायनल राउंड साठी २१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धकांचं ध्येय, हिंमत, जिद्द, चिकाटी येणाऱ्या चार दिवसांत म्हणजेच ६ ते ९ जुलै दरम्यान सिटी सेंटर मॉल येथे पहायला मिळणार आहे, ‘पैसो का पेड’ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा 104.2 माय एफ एम आणि भेट द्या मराठीमाती डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला !

  • नाशिक मध्ये मागील एक महिन्यापासून सुरु आहे ‘पैसो का पेड’
  • दीड हजारांहून अधिक नाशिक करांनी केले रजिस्ट्रेशन
  • पहिल्या राउंड मध्ये ५०० हून अधिक नाशिकरांनी दिली ऑडीशन
  • दुसऱ्या राउंड मध्ये 104.2 माय एफ.एम च्या ऑफिस मध्ये १०० लोकांचे पर्सनल इंटरव्ह्यू झाले
  • तिसऱ्या राउंड मध्ये निवड झालेल्या स्पर्धकांचे मेडिकल चेकअप झाले
  • फायनल राउंड ला २१ स्पर्धकांची निवड करण्यात आली, जे खेळतील भारतातील पहिला आणि सगळ्यात मोठा रेडीओ रिएलीटी शो

हे सगळे जण तयार आहे ‘पैसो का पेड’ धरून ठेवण्यासाठी, आज संध्याकाळपासून सुरु होईल तीन लाखांसाठीचा प्रवास, सिटी सेंटर मॉल मध्ये, कुणा एका पूर्ण होईल स्वप्नं ‘पैसो का पेड’ सोबत...